Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा शहर पोलिसांची धडक कामगिरी; 12 तासाच्या आत दरोडा घालणाऱ्या पाच जणांना शिरपूरमधून अटक

साताऱ्यामध्ये २१५ ग्रॅम सोने लुटल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना पोलीसांनी अवघ्या 12 तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 12:51 PM
पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक; 4 पिस्तुले, 7 जिवंत काडतुसे जप्त

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या टोळीला अटक; 4 पिस्तुले, 7 जिवंत काडतुसे जप्त

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यामध्ये मोठा दरोडा
  • सातारा शहर पोलिसांची धडक कारवाई
  • 12 तासाच्या आत दरोडा घालणाऱ्यांना अटक
Crime News : सातारा : सातारा शहरातील (Satara News) पोवई नाका परिसरात भररात्री अंगडिया सेवेतून पाठविण्यात आलेल्या सोन्याच्या मुद्देमालावर दरोडा टाकत सुमारे ३२ लाख ४ हजार ५०० रुपयांचे २१५ ग्रॅम सोने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार अनोळखी इसमांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्री नितीन खेमचंद जैन (वय ५०, रा. अमृतप्लाझा कॉलनी, सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ते १८५, रविवार पेठ, सातारा येथील ‘श्रद्धा ज्वेलर्स’मध्ये मागील २५ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील झवेरी बाजार येथे असलेल्या रितेश कावेडिया ज्वेलर्सकडे वितळवलेले सोन्याचे बार पाठविण्याचे तसेच तयार दागिने मागविण्याचे काम ते नियमितपणे करतात.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता जैन यांनी न्यू लक्ष्मी एअर पार्सल कुरिअर, सातारा येथील कर्मचारी कोमलसिंग परिहार यांना मुंबईसाठी कुरिअर पाठवायचे असल्याची माहिती दिली. त्यानुसार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास परिहार हे श्रद्धा ज्वेलर्स येथे आले. त्यावेळी ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार पार्सल करून त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

हे देखील वाचा : मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

मात्र, दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ७ वाजता जैन यांनी परिहार यांच्याशी संपर्क साधला असता, रात्री चार अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून सोन्याचे कुरिअर असलेली बॅग जबरीने लुटल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर जैन यांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, या घटनेत इतर ज्वेलर्सचाही मुद्देमाल लुटल्याचे समोर आले आहे. संतोषी ऑर्नामेंट्स, ५०१ पाटी, सातारा येथील शशिकांत जाधव यांचे ८५ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या गोळ्या (अंदाजे किंमत ११,५३,००० रुपये) तसेच त्रिमूर्ती गोल्ड शॉपचे मालक उत्तम साळुंखे यांचे ८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार (अंदाजे किंमत १२,६४,००० रुपये) चोरीस गेला आहे. तसेच जैन यांचा ५० ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार (अंदाजे किंमत ७,८७,५०० रुपये) लुटण्यात आला आहे. एकूण २१५ ग्रॅम वजनाचे ३२,०४,५०० रुपयांचे सोने चोरीस गेले आहे.

हे देखील वाचा : Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने

ही घटना दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील ‘राजधानी सातारा’ सेल्फी पॉईंट येथे घडली आहे. चार अनोळखी इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले. त्यांनी कोमलसिंग परिहार (वय ३६, रा. सातारा) यांना अडवून मारहाण केली आणि त्यांच्या ताब्यातील सोन्याचा मुद्देमाल जबरीने पळवून नेला. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Satara police arrest robbers who looted 215 grams of gold in 12 hours crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • crime news
  • Satara Crime News
  • Satara News

संबंधित बातम्या

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
1

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
2

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
3

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
4

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.