Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

वडगाव मावळमध्ये . बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिकांची विक्री करून ग्राहकांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एसएमडब्ल्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या दोघांवर गुन्हा दाखल झाला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 12:36 PM
SMW Builders and Developers Fraud Case Sale of mortgaged flats to banks maval news

SMW Builders and Developers Fraud Case Sale of mortgaged flats to banks maval news

Follow Us
Follow Us:
  • बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिकांची विक्री
  • वडगाव मावळमधील धक्कादायक प्रकार
  • बिल्डर्स विरोधात गुन्हा दाखल
Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव मावळ येथे घर खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिकांची विक्री करून ग्राहकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरांवर ठेवण्यात आला असून, ही घटना “साई अनिरुद्ध धाम” या निवासी गृहप्रकल्पात घडली आहे. (Maval News)  या प्रकरणी एसएमडब्ल्यू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे विकसन सतीश महेश वाघेला व महेश मोहन वाघेला (रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Crime News)

दुहेरी विक्रीचा आरोप
पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्वे क्र. 63/7 मधील फ्लॅट क्र. 19 व 20 येथे प्रकल्प उभारण्यात आला होता. सदनिका क्रमांक 101, 102 आणि 105 या फ्लॅटचा पूर्ण मोबदला स्वीकारून चंद्रकांत ठोंबरे यांच्यासोबत करार करण्यात आला. मात्र त्याच सदनिकांची नंतर इतर तिघांना नोंदणीकृत करारनाम्याद्वारे विक्री केल्याचे उघड झाले.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातावर सुनील तटकरेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘CBI चौकशीतून…’

बँकेत गहाण — ग्राहकांना माहिती नाही

या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे, प्रकल्पातील ९ सदनिका व ४ व्यापारी गाळे सुमारे १ कोटी रुपयांच्या कर्जासाठी नांदेड मर्चंट बँकेत गहाण ठेवण्यात आले होते. ही माहिती ग्राहकांपासून जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. नियमबाह्य ताबा देण्यात आला असून तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे.

हे देखील वाचा : पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

या सर्व गैरप्रकारांमध्ये  बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) न घेता ताबा देणे, भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) नसताना राहायला देणे. ग्राहकांकडून घेतलेल्या रकमेचा स्वतंत्र खात्यात हिशोब न ठेवणे, याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम 1963 (MOFA) अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वडगाव मावळ शहरात खळबळ उडाली असून, घर खरेदी करताना कोणावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Smw builders and developers fraud case sale of mortgaged flats to banks maval news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • crime news
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
4

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.