Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर तालुक्यात वनात आग लावताना दोघांना अटक; सासवड वन विभागाची करवाई

पुरंदरच्या मांढर टोणपेवाडी व शिंदेवाडी वन विभागाच्या हद्दीत वनांना आग लावून शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असून दोघानाही अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 01:19 PM
पुरंदर तालुक्यात वनात आग लावताना दोघांना अटक; सासवड वन विभागाची करवाई

पुरंदर तालुक्यात वनात आग लावताना दोघांना अटक; सासवड वन विभागाची करवाई

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर तालुक्यात वनात आग लावताना दोघांना अटक
  • सासवड वन विभागाची करवाई
  • वनांना आगी लावल्यास एक वर्षांचा कारावास
सासवड : फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवडा संपताच तापमानात वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे. एकीकडे उष्णता वाढत असतानाच दुसरीकडे काही समाज कंटकाकडून डोंगरी भागातील वनांना आगी लावण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. दरम्यान, पुरंदरच्या मांढर टोणपेवाडी व शिंदेवाडी वन विभागाच्या हद्दीत वनांना आग लावून शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असून दोघानाही अटक केली आहे.

 

प्रशांत सत्यवान साठे, कुमार पांडुरंग परबळ (दोघेही रा. भोंगवली, ता. भोर) अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २० फेब्रुवारी रोजी सदर आरोपींनी पुरंदरच्या मांढर टोणपेवाडी व शिंदेवाडी वन विभागाच्या हद्दीत प्रवेश करून परिसरात आग लावून दिली. तसेच आग लावल्यानंतर तेथेच उभे राहून वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या प्रयत्नात होते. याबाबत स्थानिक वनकर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेवून आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याच्यावर प्रतिहल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, वन कर्मचाऱ्यांनी शिफातीने ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली.

सदरची कारवाई पुण्याचे उप वनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक आणि सासवडचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली परिंचे वनपाल आर बी रासकर, मांढरच्या वनरक्षक श्रीमती एसव्ही साठे, पांगारे वनरक्षक जी व्ही तांबे, नारायणपूर वनरक्षक वय एस नजन, आंबळेचे वनरक्षक व्ही टी खरात, जेजुरीचे वनरक्षक डी देवकर, देवडीचे वनरक्षक ए एम लव्हाळे, वन कर्मचारी किशोर कुंभारकर यांच्या पथकाने केली. संबंधित आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ब, २६ (१) क, ५२ (२) त्याचप्रमाणे महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे नियम ९ (१) (क), ९ (१) (ब), वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ चे उल्लंघन केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरंदर तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ असून, वनांचे मोठे प्रमाण आहे. या वनात हजारो लहान मोठे कीटक, प्राणी, पशुपक्षी यांचे वास्तव्य आहे. तसेच शेकडो वेगवेगळ्या वनस्पती औषधी वनस्पती आणि जंगली झाडे आहेत. डोंगरी परिसारत गवत मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांसाठी चाराही उपलब्ध होतो. दरवर्षी उन्हाळा सुरु होताच समाजकंटक वनांना आगी लावून वनसंपत्ती नष्ट करतात. परिणामी निसर्गाचे प्रचंड नुकसान होते. आजपर्यंत गुन्हेगार सापडत नसल्याने वनांना आगी लागण्याचे कारण स्पष्ट होत नव्हते. मांढर टोणपेवाडी परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आगी लावल्याचे उघडकीस आले असून, दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.

वनांना आगी लावल्यास एक वर्षांचा कारावास

वनक्षेत्रास वणवा लावणे हा भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा आहे. यानुसार एक वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा आहे. त्यामुळे वनांना आगी लावू नयेत अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा सासवडचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे एखाद्या भागात आग लागल्याचे दिसून आल्यास स्थानिक वनकर्मचाऱ्यांना माहिती द्यावी आणि ग्रामस्थांनी वणवा विझविण्यास मदत करून वनसंपदेचे संरक्षण करावे असे आवाहन सागर ढोले यांनी केले आहे.

Web Title: Police have arrested two people while setting fire to a forest in purandar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Purandar News

संबंधित बातम्या

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले
1

डोक्याला विग अन् पुणे शहरात घरफोड्या; पोलिसांनी गुजरातच्या आरोपीसह चौघांना पकडले

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
2

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
3

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
4

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.