
Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या
Murder Case: अहिल्यानगर (अहमदनगर) जवळील भिंगार परिसरातील वडारवाडी येथून एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. गेल्या १० वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांमधून निर्माण झालेल्या संशयाचा शेवट एका अत्यंत भीषण हत्येने झाला आहे. वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्यावर प्रियकरानेच चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अनिता देविदास आळकुटे (वय ४२) असे मृत महिला कर्मचाऱ्याचे नाव असून, त्या वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. संशयित आरोपी संतोष धोत्रे (वय ४९) आणि अनिता यांच्यात गेल्या १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिता यांचे दुसऱ्या एका व्यक्तीशी जवळीक किंवा प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोष याला आला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद निर्माण होत होते. याच संशयाचे भूत डोक्यात सवार झाल्याने संतोष याने थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथे काम करत असलेल्या अनिता यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने सपासप वार केले. या गंभीर हल्ल्यात अनिता यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या रक्तरंजित घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. मृत अनिता यांचा मुलगा योगेश आळकुटे याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी संशयित आरोपी संतोष धोत्रे याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत.
Ans: ही घटना अहिल्यानगरजवळील भिंगार परिसरातील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात घडली.
Ans: मृत महिलेचे नाव अनिता देविदास आळकुटे (वय ४२) असून, आरोपी प्रियकराचे नाव संतोष धोत्रे (वय ४९) आहे.
Ans: गेल्या १० वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये अनिता यांचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध असल्याच्या संशयातून संतोष याने ही हत्या केली.