सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, साक्री येथील शाळेत मंगळवारी सत्र परीक्षा किंवा सहामाही परीक्षा सुरू होती. दुपारी कृष्णाची परीक्षा संपली. पेपर संपल्यानंतर कृष्णा थेट घरी न जाता, दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याच्या काही मित्रांसोबत साक्री येथील कान नदीवरील ‘नकट्या बंधाऱ्याकडे’ पोहण्यासाठी गेला. सर्व मित्र हसत-खेळत पाण्यात उतरले. मात्र, काही क्षणातच पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा पाण्याच्या खोलात गेला आणि तो थेट बुडू लागला. कृष्णाला पाण्यात बुडताना पाहून त्याच्या मित्रांनी तात्काळ आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
मुलांच्या आरडाओरड ऐकून परिसरातील काही स्थानिक तरुण आणि नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कृष्णाला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णाची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. एका हुशार आणि तरुण विद्यार्थ्याचा असा अचानक झालेल्या दुर्दैवी अंतमुळे कृष्णा
Ans: धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात कान नदीवरील नकट्या बंधाऱ्यावर ही घटना घडली.
Ans: मृत विद्यार्थ्याचे नाव कृष्णा निशांत चाळसे असून तो साक्री येथील शाळेत दहावीत शिकत होता.
Ans: सहामाही परीक्षा संपल्यानंतर मित्रांसोबत पोहायला गेलेल्या कृष्णाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला.






