Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…

Suicide Case: "तू मला आवडत नाहीस, कुठेतरी जाऊन मर..." लिव्ह-इन पार्टनरच्या टोमण्यांनी घेतला २४ वर्षीय तरुणीचा बळी! मृत्यूपूर्वी आईला रडत केला होता शेवटचा कॉल... अडीच वर्षांचा चिमुकला झाला पोरका!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 19, 2026 | 03:46 PM
Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी...

Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी...

Follow Us
Follow Us:
  • लिव्ह-इन पार्टनर व त्याच्या कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या
  • लग्नास नकार देत मयूर व त्याचे कुटुंबीय तिला मरण्यासाठी प्रवृत्त करत होते
  • मयूरसह चौघांना अटक; अडीच वर्षांच्या मुलाचा ताबा आजीकडे सुपूर्द
Suicide Case: सोशल मीडियावरील ओळख, प्रेम आणि त्यानंतर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय एका २४ वर्षीय तरुणीच्या जिवावर बेतला आहे. लिव्ह-इन पार्टनरच्या सततच्या टोमण्यांना आणि मानसिक छळाला वैतागून तरुणीने राहत्या घरातच आपले जीवन संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना अहमदाबाद शहरातून समोर आली आहे. दक्षा परमार असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे तिचा अडीच वर्षांचा चिमुकला पोरका झाला आहे.

हेही वाचा: Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्…चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!

इन्स्टाग्रामवरील मैत्री ते लिव्ह-इन नात्याचा प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षा आणि मयूर परमार २०२१ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर जानेवारी २०२३ पासून दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. मयूर लग्न करण्यास सतत टाळाटाळ करत असल्याने दक्षाचे तिच्या आईशी मतभेद झाले होते आणि त्यांनी संबंध तोडले होते. मात्र, २०२४ मध्ये दक्षाने एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिने आईशी पुन्हा संपर्क साधला आणि हळूहळू मायलेकींचे नाते पूर्ववत झाले. दरम्यान, मयूर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य दक्षाला नेहमी ‘तू मला अजिबात आवडत नाहीस, हे घर सोडून निघून जा किंवा कुठेतरी जाऊन मर’ अशी दूषणे देत मानसिक छळ करत असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

मृत्यूपूर्वी आईशी शेवटचे संभाषण

घटनेच्या दिवशी दक्षाने मयूरच्या फोनवरून तिच्या आईला कॉल करून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याचे सांगितले होते. मयूर आपल्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे तिने रडत आईला स्पष्ट केले होते. त्यावर तिच्या आईने ‘उद्या मी तुझ्या घरी येते आणि सर्वांशी बोलते’ असे सांगून तिची समजूत काढली होती. परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते; त्याच रात्री ९ वाजेच्या सुमारास मयूरनेच दक्षाच्या आईला फोन करून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी दिली. या दुर्दैवी घटनेनंतर दक्षाच्या आईने बापू नगर पोलीस ठाण्यात धाव घेत मयूर आणि त्याच्या कुटुंबाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली.

हेही वाचा: Beed News: १ कोटी ३ लाखांहून अधिकचा घोटाळा अन् कारवाईची भीती; नांदूरघाटच्या सरपंच अपात्र; फौजदारी गुन्ह्याचे आदेश!

पार्टनरसह कुटुंबातील चौघांना बेड्या; चिमुकला आजीच्या स्वाधीन

दक्षाच्या आईने दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत अहमदाबाद पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी मयूर परमार, त्याचे आई-वडील आणि त्याच्या लहान भावाला अटक केली आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८ आणि ५४ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, आईच्या मृत्यूनंतर आणि वडील तुरुंगात गेल्यानंतर अडीच वर्षांचा चिमुकला पोरका झाला होता; पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या लहानग्याचा ताबा आता त्याच्या आजीकडे म्हणजेच दक्षाच्या आईकडे सुपूर्द केला आहे.

लिव्ह-इन नात्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

या भीषण प्रकरणामुळे लिव्ह-इन रिलेशनशिपमधील कायदेशीर आणि मानसिक गुंतागुंतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जोडीदाराकडून होणाऱ्या मानसिक छळाला वेळीच वाचा फोडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत असून, एका निष्पाप तरुणीला टोमणे मारून मरण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अहमदाबादमधील २४ वर्षीय दक्षा परमार हिने आत्महत्या का केली?

    Ans: लिव्ह-इन पार्टनर मयूर परमार लग्नास टाळाटाळ करत होता आणि तो व त्याचे कुटुंबीय तिला सतत टोमणे मारून 'कुठेतरी जाऊन मर' असे म्हणत मानसिक छळ करत असल्याने दक्षाने आत्महत्या केली.

  • Que: याप्रकरणी पोलिसांनी कोणाकोणाला अटक केली आहे?

    Ans: बापू नगर पोलिसांनी मुख्य आरोपी मयूर परमार, त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ अशा एकूण चार जणांना BNS कलम १०८ आणि ५४ अंतर्गत अटक केली आहे.

  • Que: दक्षा आणि मयूरच्या अडीच वर्षांच्या मुलाचा ताबा कोणाकडे देण्यात आला आहे?

    Ans: पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा ताबा त्याच्या आजीकडे म्हणजेच मृत दक्षाच्या आईकडे सुपूर्द केला आहे.

Web Title: Ahmedabad live in partner harassment daksha parmar suicide four arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Harrasment of Woman
  • Live In Relation
  • Suicide case

संबंधित बातम्या

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!
1

Bank Manager Suicide: वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून इंडियन बँकेच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीतून धक्कादायक खुलासे!

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
2

क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.