Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; विशेष सरकारी वकीलपदी अजय मिसार यांची नियुक्ती

आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातचं आता स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकीलपदी ॲड. अजय सुहास मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 22, 2025 | 02:14 PM
स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; विशेष सरकारी वकीलपदी अजय मिसार यांची नियुक्ती

स्वारगेट बलात्कारप्रकरणी मोठी अपडेट; विशेष सरकारी वकीलपदी अजय मिसार यांची नियुक्ती

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील स्वारगेट या गजबजलेल्या एसटी डेपोत शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली. तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपी दत्ता गाडेला शिरूर तालुक्यातील गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. या प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातचं आता स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकीलपदी ॲड. अजय सुहास मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतेच आराेपपत्र केले. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. प्रवासी तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेल्या दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २८ फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. बलात्कार प्रकरणाच्या तपासात गाडेविरुद्ध भक्कम पुरावे संकलित करण्यात आले असून, विशेष न्यायालयात गाडेविरुद्ध नुकतेच आरोपपत्र दाखल केले.

स्वारगेट बलात्कार प्रकरणात अजय मिसार यांची विशेष सरकारीपदी नियु्क्ती करण्याची विनंती पोलिसांनी विधी विभागाकडे केली होती. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच न्याय आणि विधी विभागाने मंजूरी दिली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मिसार मूळचे नाशिकचे आहेत. त्यांनी अनेक गंभीर गुन्हे, तसेच दहशतवाद विरोधी कारवायांच्या अनुषंगाने दाखल असलेल्या खटल्यात शासनाकडून बाजू मांडली आहे, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Ajay misar has been appointed as special public prosecutor in the swargate case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • Datta Gade Arrested
  • Pune Police Action
  • Swargate Case

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.