Pravin Gaikwad Attack: प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; सात जणांवर थेट...
अक्कलकोट: गैरकायद्याची मंडळी जमवुन संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष. प्रविण गायकवाड व सोलापुर जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले . यांच्या अंगावर शाई वंगण टाकुन छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देवून सर्वांना धक्काबुक्की करुन हाताने मारहाण केली. इनोव्हा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केल्याबबत अक्कलकोट उत्तर पोलीसात दाखल गुन्हयाबाबत संशयित मुख्य आरोपी दिपक काटे व भवानेश्वर बबन शिरगिरे यांना अक्कलकोट उत्तर पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपिना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. या घटनेबाबत इतर पाच संशयित आरोपी फरार आहेत . संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड व संभाजी बिग्रेड सामाजिक संस्था ‘ सोलापुर जिल्हा अध्यक्ष संभाजी दशरथ भोसले हे अक्कलकोट येथे एका कार्यक्रमास आले होते.
यावळी संशयित आरोपी दिपक काटे किरण साळुंखे, रा. भवानी नगर, इंदापुर ‘ भैय्या ढाणे रा. भवानी नगर, इंदापुर . ‘ कृष्णा क्षिरसागर, रा. कसबा बारामती, जि.पुणे ‘अक्षय चव्हाण, रा. तांदुळवाडी बारामती,जि.पुणे ‘ बाबु बिहारी रा.तांदुळवाडी बारामती, जि.पुणे ‘ भवानेश्वर बबन शिरगिरे रा. इंदापुर, जि.पुणे हे . प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड व जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यावर शाई वंगण फेकले होते . या वेळी प्रदेश अध्यक्ष गायकवाड गाडीत बसले असता त्यांना गाडीतुन खेचुन बाहेर आणण्यात येऊन त्यांच्या शाई वंगण टाकले . त्यांनां सोडविण्यासाठी आलेल्या व्यक्तीनां व त्यानां धक्काबुक्की मारहाण करण्यात आल्या चे चित्रण समाज माध्यमावर फिरत आहे यामुळे या बद्दल शिवप्रेमी मध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे इतर संशयिताना तात्काळ ताब्यात घ्यावे आरोपी वर अंत्यत कडक कारवाई व्हावी अथी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे