
crime (फोटो सौजन्य: social media)
Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
काय घडलं नेमकं?
आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव शंकर सुरेश बोंडे असे आहे. तो रामदासपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तेल्हारा तालुक्यातील २७ वर्षीय तरुणी बाळापूर नगरपालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करते. ती रोज अकोल्याहून बाळापूर येथे महामार्गाने ये-जा करते. सायंकाळच्या सुमारास काम आटोपून अकोल्याकडे परतत असतांना आरोपी अधिकाऱ्याने तिचा पाठलाग केला. त्यानंतर गाडी तिच्या आडवी लावली. आरोपीने तरुणीशी अश्लील शब्दांत बोलत हातवारे केले असा आरोपी तिने केला आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच तरुणीने तात्काळ डायल 112 वर कॉल केला.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं. तरुणीला सुरक्षितरित्या बाळापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिच्या तक्रारीनुसार BNS कलम 78, 79 आणि 126(2) अंतर्गत गुन्हा दाखल करत PSI शंकर बोंडे याला अटक करण्यात आली आहे. ही घटना शेळद फाटा ते व्याळा रस्त्यावरील जिओ पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणाचा तपास PSI माधुरी पाटील करीत आहेत.
नागरिकांमध्ये संताप
या घटनेमुळे अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने अकोला पोलीस दलाची प्रतिमा मालिन झाली. आता पोलिसच असे कृत्य करत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा? कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तर न्याय कुणाकडे मागायचा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा
Ans: अकोला–खामगाव राष्ट्रीय महामार्गावर, जिओ पेट्रोल पंपाजवळ.
Ans: PSI शंकर सुरेश बोंडे, रामदासपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत.
Ans: तरुणीला मदत कशी मिळाली?