crime (फोटो सौजन्य: social media)
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू गावातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बोरगाव मंजू गावातील नवीन नवीन लग्न झालेल्या तरुण मनीष धनराज चव्हाण याला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनीष चव्हाणच्या पत्नीने याबाबत मुर्तिजापूरातील एका विवाहित महिलेवर आणि तिच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केला आहे. मनीषच्या पत्नीने पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
मनीष चव्हाणचे दोन महिन्यांपूर्वीच अकोल्याच्या अमानतपूर गावातील त्याच्या सख्या मामाच्या मुलीसोबत पारंपरिक पद्धतीने लग्न झाले होते. आर्नी दिनेश पवार असे मनीषच्या पत्नीचे नाव आहे. लग्नानंतर मनीष आणि आर्नी यांचा संसार सुरळीत सुरु असतांनाच मनीषची ओळख मूर्तिजापूर येथे राहणाऱ्या सीमा पवार या विवाहित महिलेबरोबर झाली. सीमा पवारचे चार वर्षांपूर्वी अमर पवार या तरुणाशी लग्न झाले होते. अकोल्यातील मुर्तिजापूरच्या ती विवाहित असून सुद्धा मनीषसोबत तिचे संबंध वाढले. सीमा पवार हे अकोल्यातील मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे.
पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, सीमाने आपल्या दोन नातेवाईकांच्या मदतीने मनीषला पळून जाण्यास प्रवृत्त केले. मनीष आणि सीमा दोघेही बेपत्ता झाले असून, या प्रकरणात सीमासह मनीष आणि आणखी दोन जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर मनीषच्या कुटुंबीयांनी व समाजातील इतर नातेवाईकांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती.या घटनेने खळबळ उडाली आहे.
अकोल्यात सरकारी रुग्णालयात रुग्णांना नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यात सापडलं पालीचं मुंडकं
अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णाच्या नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यामध्ये चक्क मृत पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या क्रमांक ३२ वार्डमधील दाखल असलेल्या शेख सोहेल या रुग्णाच्या कांदेपोह्याच्या नाश्त्यात हे पालीचं मुंडकं आढळून आलं आहे. त्यांनी नाश्त्याच्या पोह्याची प्लेट रुग्णालय बाहेरील ‘अग्रवाल’ नावाच्या रेस्टॉरंटमधून आणली होती, त्यामध्ये हे हे पालीचं मुंडकं आढळल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, तर पोहे खाल्ल्यानंतर रुग्णाला अर्थातच सोहेल’ला मळमळ आणि उलटी झाली होती. हा मुद्दा आता अकोल्यात चांगलाच चर्चेत आला आहे.
हा प्रकार वैधकीय अधिकाऱ्यांना कळवला मात्र अध्यापपर्यंत रेस्टॉरंटवर कोणतीही कारवाई झाली नाही. नागरिकांनी बाहेर उघड्यावर काही खात असाल तर सतर्कता बाळगावी, अन्न अथवा जे काही बाहेरून खाण्यासाठी घेत असाल तर तपासूनच खावे असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलं आहे.
वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली 3 लाखांची फसवणूक; बिहारसह झारखंडच्या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल