जळगावच्या धरणगावात नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांजाची तस्करी करणारी कार पकडली आहे. ४० किलो गांजा आणि कारसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनीं पाठलाग केला असता भीतीने कार चालकांनी झाडाझुडपांमध्ये वाट काढत आणि कार जागीच सोडून पळून काढला. सध्या पोलीस या दोन संशयीत फरार आरोपींचा शोध घेत आहे. मात्र पोलिसांच्या कारचा थरारक पाठलाग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
पुढे आलेल्या माहितीनुसार, चोपड्याकडून जळगावकडे जात असतांना नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका कारवार संशय आला. पोलिसांनी संशयित कारला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरु असल्याचे लक्षात येताच कार चालकाने धरणगाव बस स्थानकाजवळून यू-टर्न घेत पारोळा रस्त्याकडे कार वळवली आणि झाडाझुडपांमध्ये कार टाकून दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता तब्बल ४० किलो गांजा आढळला ज्याची किंमत साधारण दहा लाख रुपये आहे. तर ,कार आणि गांजा एकूण २० लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र आरोपींनी पळ काढण्यात यश मिळाले आहे.
भंडारा हादरलं! दोन गटात अस्तित्वाच्या लढाईतून धारधार शस्त्राने दोघांची हत्या
भंडाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भंडाऱ्यामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरु होती. त्यातून शनिवारी (९ ऑगस्ट) दोघांवर धारधार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना भंडाऱ्यात रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही लढाई सुरु होती. हत्या झालेल्या व्यक्तींची नावे वसीम उर्फ टिंकू खान (35) आणि शशांक गजभिये (30) असे मृतांची नवे आहेत.
हल्ला करणारे हे तीन ते चार हल्लेखोर होते. टिंकू खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररीतून चौकातील कार्यालयात बसले असतांना हल्लेखोरांशी वाद झाला. त्यातूनच ही हत्या घडल्याची माहिती समोर येत आहे. टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भंडाऱ्यात वाद सुरु होता. यातूनच ही १हत्या घडल्याचं बोलल्या जात आहे.
Beed Crime: नातवानेच केली आजीची हत्या; आई वडीलदेखील जखमी; पैश्यासाठी केला वार