Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambenali Ghat crime : धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Ambenali Ghat crime News : आंबेनळी घाटातील खोल दरीमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या आजीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटातील दरीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 05, 2026 | 12:07 PM
धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायक! स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • स्वतःच्या आजीचा खून करून मृतदेह घाटात फेकला
  • आरोपी पोलिसांच्या ताब्यात
  • घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते
Ambenali Ghat crime News Marathi : आंबेनळी घाट पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत आला आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यानच्या खोल दरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली असून, अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या आजीची हत्या करून तिचा मृतदेह घाटातील दरीत फेकल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाने दोन दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणातून किंवा अन्य वादातून आपल्या आजीचा खून केल्याचा संशय आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत नेऊन फेकून दिला. दुर्गम भागात मृतदेह आढळल्याने सुरुवातीला पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे आणि घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते. यावेळी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी धाडसी रेस्क्यू मोहीम राबवत खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले. या मोहिमेदरम्यान मोठी खबरदारी घेण्यात आली.

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

दरम्यान, तपासादरम्यान अलिबाग पोलिसांनी संशयाच्या आधारे संबंधित युवकाला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, मृतदेह ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता ते ठिकाणही पोलिसांना दाखवून दिले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कौटुंबिक नात्यांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून हत्येमागील नेमके कारण, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच या घाटात भीषण अपघात होऊन आठ युवकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण अद्याप ताजी असतानाच आता खून प्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही आंबेनळी घाटातील याच परिसरात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याची घटना घडली होती. त्यामुळे हा परिसर पुन्हा एकदा गूढ आणि गंभीर घटनांमुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.

मोठी बातमी ! कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला राजस्थानातून अटक; 9 महिन्यांपासून होता फरार

Web Title: Alibag youth killed grandmother body dumped ambenali ghat poladpur crime news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Ambenali Ghat
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या
1

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
2

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत
3

Bengaluru Crime : Gemini AI ला विचारून रचला तिहेरी हत्येचा कट; आधी आंधळं कसं….; लिव्ह-इन पार्टनरसह दोघे अटकेत

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना
4

Karnataka Crime: ‘संपत्ती कशी वाटायची’ चिठ्ठीत लिहिलं अन् संपूर्ण कुटुंब संपवलं; म्हैसूरमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.