Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा

गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांबाबत पोलिस चौकीत नेमकं काय घडलं? आठ मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या आरोपांनंतर मानवाधिकार आयोगाच्या फॅक्ट फाइंडिंगनंतर ११ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 24, 2026 | 04:09 PM
गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांबाबत पोलिस चौकीत नेमकं काय घडलं? आठ मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या आरोपांनंतर मानवाधिकार आयोगाच्या फॅक्ट फाइंडिंगनंतर ११ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांबाबत पोलिस चौकीत नेमकं काय घडलं? आठ मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या आरोपांनंतर मानवाधिकार आयोगाच्या फॅक्ट फाइंडिंगनंतर ११ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
Follow Us:
  • आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचा आरोप
  • तीन मुलांना पोलिस वाहनाच्या बोनेटला बांधून फिरवल्याचे आयोगाच्या अहवालात नमूद
  • ११ पोलिसांविरुद्ध गुन्हा; तपास सीआयडीकडे
 

पुणे : आंबेगाव पठार पोलीस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ११ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्टनंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार पुणे गुन्हे अन्वेषण विभागातील संकेत सतीश गोसावी यांनी केली होती. आयोगाच्या आदेशानुसार प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

आठ अल्पवयीनांना ताब्यात घेतल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२६ रोजी चार अल्पवयीन मुलांना आंबेगाव पठार पोलीस चौकीत आणण्यात आले. त्यानंतर २१ जुलै रोजी आणखी चार मुलांना ताब्यात घेण्यात आले. या आठही मुलांना कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे. त्यांना बालकल्याण समिती अथवा बाल न्याय मंडळासमोर वेळेत हजर करण्यात आले नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

मारहाण आणि बोनेटला बांधल्याचा आरोप

या प्रकरणातील काही अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून बेल्ट तसेच इतर वस्तूंनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यापैकी तीन मुलांना पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटला बांधून सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संबंधित मुलांची ओळख सार्वजनिक झाल्याचे आणि त्यांचा अपमान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मानवाधिकार आयोगाच्या फॅक्ट फाइंडिंगमध्येही या घटनांबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. पोलिसांच्या ताब्यात असताना अल्पवयीन मुलांशी करण्यात आलेल्या वर्तनाची चौकशी करण्याचे निर्देश आयोगाने दिले होते.

जातिवाचक शिवीगाळीचाही आरोप

या प्रकरणातील चार अल्पवयीन मुले अनुसूचित जातीतील असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचा आरोपही पोलिसांवर करण्यात आला आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यातील संबंधित कलमांनुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ पोलिसांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह गणेश मोहिते, स्नेहल थोरात, निलेश मोकाशी, सुनील हनवटे, दिनेश टापके, मितेश चोरमोले, सागर बोरसे, सोहम रोडेकर, मंगेश पवार आणि स्वप्ना भिसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगर हादरले! मावस भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असा’ झाला प्रकार उघडकीस

विविध कलमांनुसार कारवाई

आरोपी पोलिसांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह बाल न्याय कायदा २०१५ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे, मारहाण, क्रूर वर्तन, मुलांची ओळख उघड करणे आणि जातिवाचक अपमान यासंबंधी आरोपांचा त्यात समावेश आहे.

सीआयडीकडून तपास

या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सुनील रामनंद हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील आरोपांची पुढील सत्यता स्पष्ट होणार आहे.

११ पोलिसांची नावे

  1. मानसिंग पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक
  2. गणेश मोहिते – सपोनि
  3. स्नेहल थोरात – सपोनि
  4. निलेश मोकाशी – पोनि
  5. सुनील हनवटे – पोहवा
  6. दिनेश टापके – पोहवा
  7. मितेश चोरमोले – पोलीस अंमलदार
  8. सागर बोरसे – पोलीस अंमलदार
  9. सोहम रोडेकर – पोलीस अंमलदार
  10. मंगेश पवार – पोलीस अंमलदार
  11. स्वप्ना भिसे – महिला पोलीस अंमलदार

Web Title: Ambegaon pathar minors assault 11 police fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • pune crime case

संबंधित बातम्या

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
1

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?
2

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
3

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला
4

Crime News: गणपती दर्शनाला मित्र-मैत्रिणींसोबत गेल्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.