
crime (फोटो सौजन्य: social media)
नैनाच्या अधिकाऱ्याला व उपअधीक्षकाला सहा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
काय घडलं नेमकं?
अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे. दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून अचानक कार्यालयाच्या दिशेने ३-४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले. दरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या. यात वाळेकर यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही सर्व घटना कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गर्दी केली. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. उमेदवारांच्या कार्यालयावर हल्ला झाल्याने काही प्रमाणात परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नाव सांगूनही गुन्हा दाखल नाही
याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात दोन आरोपींचे नाव सांगण्यात आले तरीदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. आज संध्याकाळी अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.
Ans: अंबरनाथ पश्चिमेतील शंकर मंदिर परिसरातील भाजप कार्यालयावर.
Ans: पवन वाळेकर यांचा सुरक्षारक्षक.
Ans: सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.