Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath News: आधी सापाचा फोटो दाखवा…; उपचारात दिरंगाईचा आरोप, 3 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

अंबरनाथमध्ये 3 वर्षांच्या चिमुरड्याचा साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. वेळेत उपचार न करता डॉक्टरांनी चावलेल्या सापाचा फोटो मागितल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून, मुलाची प्रकृती आधीच गंभीर असल्याचे सांगितले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 06, 2026 | 08:22 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 3 वर्षांच्या मुलाला घरात खेळताना विषारी सापाने दंश केला.
  • डॉक्टरांनी उपचाराआधी सापाचा फोटो मागितल्याचा पालकांचा आरोप.
  • रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळत वेळेत उपचार केल्याचा दावा केला.
अंबरनाथ: अंबरनाथ येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात खेळत असलेल्या अवघ्या ३ वर्षांच्या चिमुरड्याला एका विषारी सापाने दंश केला. हे जसेच पालकांना माहिती झाले तेव्हा पालक घाबरले. त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना आधी सापाचा फोटो दाखवा तेव्हाच उपचार करू असे सांगितले. आणि याच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अखेर त्या निष्पाप चिमुरड्याचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घडलेली घटना अंबरनाथ येथील शिवमंदिर कैलास कॉलनी भागात घडली.

काय घडलं नेमकं?

सुलतान शेख (३ वर्ष) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचा नाव आहे. सुलतान नेहमी प्रमाणे आपल्या घरात खेळत होता. खेळता खेळता अचानक एका विषारी सापाने त्याच्या कमरेला जोरदार दंश केला. यामुळे मुलगा मोठ्याने रडू लागल्याने कुटुंबीय त्याच्याजवळ गेले. तेव्हा त्यांना साप दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तातडीने सुलतानच्या कुटुंबाने उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जे म्हंटल त्याने कुटुंबीय संतापले आणि याच झालेल्या गोंधळात या चिमुरड्याची प्राणज्योत मालवली.

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून; लोखंडी पाईप अन् सिमेंटच्या गट्ट्याने वार करुन संपवलं

संतप्त कुटुंबीयांचा रुगालयावर आरोप

सुलतानच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलावर तातडीने औषधोपचार सुरू करण्याऐवजी सापाचा फोटो मागितला. जोपर्यंत तुम्ही चावलेल्या सापाचा फोटो दाखवत नाही, तोपर्यंत कोणता साप चावलाय हे समजणार नाही आणि तोपर्यंत उपचार करता येणार नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा पालकांनी केला आहे. साप विषारी आहे की नाही हे ओळखण्यात आणि फोटोच्या वादात मौल्यवान वेळ वाया गेला. जर डॉक्टरांनी हा अजब हट्ट धरला नसता आणि वेळेवर अँटी स्नेक व्हेनम किंवा इतर आवश्यक उपचार सुरू केले असते, तर आज आमचा मुलगा जिवंत असता, असा टाहो सुलतानच्या आई-वडिलांनी फोडला आहे.

रुग्णालयाने फेटाळले आरोप

मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि प्रशासनाने शेख कुटुंबीयांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, मुलाला जेव्हा आणले गेले तेव्हा त्याची प्रकृती आधीच खूप खालावली होती. डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारच्या फोटोची मागणी केली नव्हती आणि मुलाला वाचवण्यासाठी वेळेवर सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, विष शरीरात वेगाने पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरु

नातेवाईकांच्या या गंभीर आरोपांनंतर रुग्णालयात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांनी यादरम्यान घोंषणाबाजी केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वैद्यकीय क्षेत्रातील संवेदनशीलता संपली आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Pune Crime : परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: अंबरनाथमधील शिवमंदिर कैलास कॉलनी परिसरात ही घटना घडली.

  • Que: मुलाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर काय आरोप केले?

    Ans: डॉक्टरांनी उपचार करण्याआधी चावलेल्या सापाचा फोटो मागून वेळ घालवला, असा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: रुग्णालय प्रशासनाने काय स्पष्टीकरण दिले?

    Ans: मुलाची प्रकृती आधीच गंभीर होती आणि वेळेत सर्व आवश्यक उपचार करण्यात आले होते, असे प्रशासनाने सांगितले.

Web Title: Ambernath news show a photo of the snake first allegations of delay in treatment lead to the tragic death of a 3 year old child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
2

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
3

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
4

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.