Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना मिळाली धमकी’; ‘या’ गँगस्टरच्या नावाचा होतोय उल्लेख

Amitabh Bachchan Threatening Post : बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 16, 2026 | 05:04 PM
amitabh-bachchan-abhishek-bachchan-threat-gangster-goldy-dhillon bollywood news

amitabh-bachchan-abhishek-bachchan-threat-gangster-goldy-dhillon bollywood news

Follow Us
Follow Us:
  •  अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना धमकी
  • गँगस्टर गोल्डी ढिल्लन कडून बिग बींना धमकी
  • सोशल मीडिया पोस्टद्वारे धमकवल्याचा दावा
Amitabh Abhishek Bachchan Threatening Post : बॉलीवूडच्या कलाकरांवर जीवघेणा हल्ला होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर आता महानायक अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना जीवघेणी धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांना धमकी देण्यात आली असून यामागे गँगस्टर गोल्डी ढिल्लनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर अमिताभ बच्चन हे बुलेटप्रुफ काचेतून चाहत्यांची भेट घेत आहेत. तसेच या भेटीवेळी अभिषेक बच्चन कटाक्षाने नजर ठेवून असल्याचे दिसून आले आहे. न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, गोल्डी ढिल्लन नावाच्या एका गॅगस्टरने सोशल मीडिया पोस्टमधून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना धमकी दिली आहे. मात्र, या पोस्टमध्ये नेमके काय लिहिले आहे आणि या धमकीमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

गँगस्टर गोल्डी ढिल्लन सध्या कुठे आहे?

अमिताभ बच्चन धमकी प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. गँगस्टर गोल्डी ढिल्लन हा भारतामध्ये नसून सध्या स्पेनमध्ये असल्याचे बोलले जात आहे. गँगस्टर गोल्डी ढिल्लनचे नाव यापूर्वी गुन्हेगारी कारवाया आणि गँगस्टर नेटवर्कशी संबंधित चर्चांमध्ये समोर आले आहे. वृत्तांनुसार, गोल्डी ढिल्लनचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी कोणताही संबंध नाही आणि त्याला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून संबोधले जात आहे. परिणामी, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना आलेल्या कथित धमक्यांमुळे या प्रकरणावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. एक्स (ट्वीटर) वर पोस्ट करत बिग बी यांनी ‘वाचलो’ (बच गए) अशी पोस्ट केली होती. त्यांच्या या सूचक पोस्टमुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे. तसेच बॉलीवूड सिलेब्रिटींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर गोळीबार करण्याचा कट; दोन शूटर अटकेत, कारण आलं समोर!

अमिताभ बच्चन हे त्यांचे निवासस्थान जलसा बाहेर चाहत्यांची दर रविवारी भेट घेत असतात. आता ते चाहत्यांची भेट घेताना सुरक्षेची विशेष काळजी घेत असल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांना भेटताना ते बुलेट प्रुफ काचेमध्ये असतात. त्याचप्रमाणे वडिलांच्या मागे मुलगा अभिषेक बच्चन हा करडी नजर ठेवून असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना धमकी कोणी दिली?

    Ans: सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ‘गोल्डी ढिल्लन’ नावाच्या गँगस्टरकडून अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Que: अमिताभ बच्चन यांना यापूर्वीही सुरक्षा वाढवावी लागली होती का?

    Ans: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. चाहत्यांची भेट घेताना ते बुलेटप्रुफ काचेमागून संवाद साधताना दिसत आहेत.

Web Title: Amitabh bachchan abhishek bachchan threat gangster goldy dhillon on social media nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • amitabh bachchan
  • bollywod news

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर गोळीबार करण्याचा कट; दोन शूटर अटकेत, कारण आलं समोर!
1

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावर गोळीबार करण्याचा कट; दोन शूटर अटकेत, कारण आलं समोर!

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा
2

PMC Bomb Threat Email: पुणे-मुंबईत खळबळ! पीएमसीच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब हल्ल्याचा इशारा

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म
3

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री
4

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.