Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातून राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीचे खास किस्से समोर आले आहेत. बिग बींच्या स्वागतासाठी राजीव गांधींनी बेसूर बँड आणला होता.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2026 | 09:27 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sonia Gandhi:बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यातील मैत्रीचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. आता सोनिया गांधी यांच्या नव्या ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातून त्यांच्या मैत्रीशी संबंधित काही खास आठवणी समोर आल्या आहेत. या पुस्तकात सोनिया गांधी यांनी राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या जुन्या मैत्रीबद्दल अनेक रंजक किस्से सांगितले आहेत. विशेष म्हणजे, सोनिया गांधी पहिल्यांदा इटलीहून भारतात आल्या, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी राजीव गांधी, संजय गांधी यांच्यासोबत अमिताभ बच्चनही उपस्थित होते.

१३ जानेवारी १९६८ रोजी सोनिया गांधींचं भारतात आगमन

सोनिया गांधी यांनी आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून इटली सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. १३ जानेवारी १९६८ रोजी त्या पहिल्यांदा भारतात आल्या. त्यावेळी राजीव गांधी, संजय गांधी आणि अमिताभ बच्चन विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. भारतातील पहिल्या भेटीदरम्यान सोनिया गांधी अमिताभ बच्चन यांचे आई-वडील तेजी बच्चन आणि हरिवंश राय बच्चन यांच्यासोबत राहिल्या होत्या.

सोनिया गांधी यांनी पुस्तकात तेजी बच्चन यांच्याबद्दलही विशेष आठवणी सांगितल्या आहेत. तेजी बच्चन यांनी त्यांना भारतीय संस्कृती आणि चालीरीती समजून घेण्यासाठी मदत केली. त्या नेहमीच सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी तत्पर असायच्या. हरिवंश राय बच्चन यांनीही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यामुळे बच्चन कुटुंबाशी सोनिया गांधी यांचं जवळचं नातं निर्माण झालं होतं.

Divyanka Tripathi Building Fire: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीत भीषण आग; थोडक्यात बचावली, पण कुटुंबावर दुःखाचा डोंगर

अमिताभ बच्चन यांच्यासाठी राजीव गांधींनी आणला होता बेसूर बँड!

सोनिया गांधी यांनी पुस्तकात राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीचा आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होते, त्या काळापासूनच त्यांची आणि राजीव गांधी यांची मैत्री होती. दोघांची कुटुंबंही एकमेकांच्या जवळची होती.

एकदा अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत संघर्ष करत असताना दिल्लीला परतत होते. त्यावेळी राजीव गांधी त्यांना घेण्यासाठी पोहोचले. मात्र, त्यांनी अमिताभ बच्चन यांची गंमत करण्याचं ठरवलं होतं. राजीव गांधी पूर्ण बँडसह त्यांच्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी फुलांचे असंख्य हारही आणले होते. पण या स्वागतामधील सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांनी आणलेला बँड मुद्दाम बेसूर वाजत होता. अमिताभ बच्चन यांना चिडवण्यासाठी राजीव गांधी यांनी ही खास मस्करी केली होती.

सोनिया गांधी यांनी सांगितलेले हे किस्से राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील जिव्हाळ्याच्या मैत्रीची झलक दाखवतात. राजकारण आणि चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावण्यापूर्वीपासून सुरू झालेलं त्यांचं मैत्रीचं नातं किती खास होतं, हे या आठवणींमधून पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Ranveer Singh: फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज

Web Title: Sonia gandhi book amitabh bachchan rajiv gandhi friendship story ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • amitabh bachchan
  • entertainment
  • Sonia Gandhi

संबंधित बातम्या

Ranabaali OTT Release: घरबसल्या पाहा रश्मिका-विजयचा ‘रणबाली’; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी होणार रिलीज?
1

Ranabaali OTT Release: घरबसल्या पाहा रश्मिका-विजयचा ‘रणबाली’; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी होणार रिलीज?

Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग
2

Sonia Gandhi : जन्मानंतर काही तासांतच पहिल्या बाळाचा मृत्यू; सोनिया गांधींनी पुस्तकातून सांगितला हृदयद्रावक प्रसंग

Gandhi: जावाजावांची भांडणं चव्हाट्यावर, सोनिया गांधीने केले मनेका गांधीवर अनेक खुलासे
3

Gandhi: जावाजावांची भांडणं चव्हाट्यावर, सोनिया गांधीने केले मनेका गांधीवर अनेक खुलासे

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज
4

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.