
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
ही घटना सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडल्येचे समोर आले आहे. थिनरच्या फॅक्टरीत बाटल्या भरण्याचं काम सुरु होत तेव्हा हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर चार ते पाच महिला कामगारांनी तात्काळ फॅक्टरीतून पळ काढला, त्यामुळे त्या थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्यातली एक महिला कामगार आगीच्या आटोक्यात आली आणि होरपळून तिचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती अग्निशमन विभाग आणि राजापेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचे काम केले. संबंधित प्रकरणाची माहिती समोर आली तेव्हा फॅक्टरीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली. मृत महिलेचा पूर्णपणे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे शवविच्छेदनासाठी विशेष प्रक्रिया करण्यात येणार आहे. घटनेवेळी गोपी इंडस्ट्रीजचे मालक घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
एमआयडीसी परिसरात भीतीचं वातावरण
पोलीस या स्फोटामागचं कारण शोधण्याचं काम करत आहे. याप्रकरणी पुनील कुलट म्हणाले की, ‘फॅक्टरीत झालेल्या स्फोटात एका महिला कामगाराचा भाजून मृत्यू झाला. संबंधित प्रकरणात घटनेचा सखोल तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे’. या अपघातामुळे एमआयडीसी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक
Ans: मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता अमरावतीच्या राजापेठ एमआयडीसी परिसरातील थिनर फॅक्टरीत स्फोट झाला.
Ans: मोनाली कोडापे (वय 29), रा. हरदौली, तहसील आर्वी, या महिला कामगाराचा भाजून मृत्यू झाला.
Ans: रासायनिक हाताळणीतील निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडाची शक्यता असून पोलिस व अग्निशमन दल संयुक्तपणे तपास करत आहेत.