आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक
काय घडलं नेमकं?
अंकुश नगर परिसरात नाल्याचे काम सुरु असताना हर्षद उर्फ दादा शिंदे हे कामात व्यस्त होते. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती घटनास्थळी आली आणि हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राउंड फायर केले. मात्र सुदैवाने त्या गोळ्या शिंदे यांना लागल्या नाहीत. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकाच खळबळ उडाली.
गोळीबाराचा नेम चुकला तरीही आरोपी हा थांबला नाही. त्याने शिंदे यांचा पाठलाग सुरु ठेवला. काही अंतरावर जाऊन आरोपीने धारदार शस्त्र काढत हर्षद यांच्यावर एकामागून एक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत हर्षद जमिनीवर कोसळले. आसपासच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हर्षद शिंदे यांचा मृत्यू झाला होता. याघटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
आरोपी फरार
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करून तपास सुरु करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून त्यांनी पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. पोलीस या हत्येमागील नेमके कारण काय आहे. याचा शोध घेत आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा देखील शोध घेत आहे. शहरातील विविध भागात नाकाबंदी करून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
भीतीचे वातावरण
भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाले आहे. या घटनेने बीड हादरले असून पोलिसांनी नाकाबंदी करत गस्त वाढवली आहे.
Ans: 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता, बीड शहरातील अंकुश नगर परिसरात.
Ans: मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव हर्षद उर्फ दादा शिंदे असून आरोपी विशाल सूर्यवंशी असल्याची माहिती आहे.
Ans: गुन्हा दाखल करून फॉरेन्सिक तपास सुरू आहे; आरोपीच्या शोधासाठी नाकेबंदी व विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.






