भरधाव वाहनाची रुग्णवाहिकेला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू
मंचर : राज्यभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, पुण्यातदेखील दररोज अपघात घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ गावाच्या हद्दीत गुरुवार, २४ जुलै रोजी रात्री छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात त्यामधील १० भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातास पाठीमागून आलेल्या इंडिका कारने टेम्पोला अचानक कट मारणे हे कारण असल्याचे चालक शरद वामन गायकवाड (रा. मालेगाव, जि. नाशिक) यांनी सांगितले.
शरद गायकवाड हे गेल्या सहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट देत होते. देहू येथून श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जात असताना पेठ गावाजवळ इंडिका कारने कट मारल्यामुळे त्यांनी गाडीचा दाबला आणि छोटा हत्ती टेम्पो पलटी झाला. या अपघातात राजधर दौलत सोनवणे (६५), आशाबाई पोपट चव्हाण (७०), मनीषा लिंबा ह्याळीज (३५), भिराबाई बापू सूर्यवंशी (६०), स्वरा समाधान देवरे (१०), लिलाबाई वामन गायकवाड (६३), सुभाष रुपला सूर्यवंशी (५८), इंदुबाई विजया चव्हाण (५०) व इतर दोन भाविक (सर्व रा. भिलकोट, मालेगाव, जि. नाशिक) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमी भाविकांना अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने इतर वाहनांद्वारे मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल टाके यांनी दिली. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेली इंडिका कार थांबली नाही आणि चालक पळून गेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत एका सायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकावर बंडगार्डन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (वय ५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत्यू झालेल्या सायकल चालकाचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (वय ४२, रा. वडाचीवाडी, उंड्री ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोलापूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात
गेल्या काही दिवसाखाली सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे.