Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पाटस-दौंड अष्टविनायक रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाटस येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 13, 2026 | 12:30 AM
पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पाटस-दौंड रोडवर दोन दुचाकींचा भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:

पाटस  : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अनेकांना अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटस-दौंड अष्टविनायक रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाटस येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर कदम यांनी दिली.

शुभम मिनानाथ शितोळे (वय २५  रा. पाटस, देशमुखवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, गजानन आत्माराम इंगळे (, रा. पारंबी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हा दुचाकी चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याचावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ही घटना शुक्रवार, दिनांक ११ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास पाटस-दौंड रोडवरील जुन्या इरिगेशन कॉलनीजवळील धोकादायक वळणावर घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दुचाकी गजानन आत्माराम इंगळे हा होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल (क्र. MH-30-AS-1914) वरून भरधाव वेगात पाटसच्या दिशेने येत होता. जुन्या दौंड-पाटस रोडच्या वळणावर अचानक वळल्याने त्याचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी पाटस बाजूकडून दौंड बाजूकडे जाणारे शुभम शितोळे हा बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल (क्र. MH-42-V-5695 ) वरून येत होता. आरोपीच्या मोटारसायकलने शुभमच्या गाडीला जोराची ठोकर दिली. या धडकेत शुभमच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने पाटस येथील खासगी रुग्णालयात  उपचारासाठी नेण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या आरोपी गजानन इंगळे याच्यावर  दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मृत शुभम याचे चुलते नितीन शितोळे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गजानन इंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार आर. जे. जाधव हे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

Web Title: An accident involving two two wheelers has occurred on the patas daund road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Bike Accident

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश
2

‘त्या’ अपघातग्रस्त कुटुंबांना मदत, जखमींना 50 हजार देण्यासाठी पाठपुरावा; पालकमंत्री सावे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.