Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील ‘या’ मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसची दुचाकींना धडक; जखमींचा आकडाही आला समोर

पावसापासून बचाव करण्यासाठी कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीस्वारांना शिवाई बसने धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 04:30 PM
पुण्यातील 'या' मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसची दुचाकींना धडक; जखमींचा आकडाही आला समोर

पुण्यातील 'या' मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसची दुचाकींना धडक; जखमींचा आकडाही आला समोर

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीस्वारांना शिवाई बसने धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस सुरू असल्याने पाच ते सहा दुचाकीस्वार कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या शिवाई बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने दुचाकींना जोरदार धडक दिली. यातील एक दुचाकी थेट बसखाली अडकली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमी तिघांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

हे सुद्धा वाचा : पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजून मित्राजवळ सोडले, नंतर हॉटेलमध्ये…; छत्रपती संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार

पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

पैठण तालुक्यातील विहामांडवा-चौंडाळा मार्गावरील सहकारी साखर रेणुकादेवी-शरद कारखान्यासमोर रविवारी (२१ जून) रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पारधी कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. साखर रेणुकादेवी-शरद सहकारी कारखान्याच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेल्या पारधी कुटुंबातील पाच जण दोन मोटारसायकलींवरून प्रवास करत होते. यावेळी समोरून येणाऱ्या पिकअप (क्र. एमएच १७. के. ९०७७) लोडिंग वाहनाची मोटारसायकलशी समोरासमोर जोरदार धडक झाली. भरधाव पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३०), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय ५), संजना अभिषेक चव्हाण (वय २२) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पारधी समाजातील मोठ्या संख्येने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरी बोबडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हे सुद्धा वाचा : 22 शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा, पण पोलिसांच्या भूमिकेवर संशय; ग्रामीण भागात रंगली चर्चा

Web Title: An incident has occurred in pune where a shivai bus collided with two wheelers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Accident News
  • Bus Accident
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.