Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

ग्रामीण पोलिस दलात बीडीडीएस पथकात पोलिस अंमलदार असलेल्या पतीने १० लाखांच्या कर्जफेडीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा छळ केला, तसेच तिला मारहाण करून कपडे फाडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2026 | 03:00 PM
माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

Follow Us
Follow Us:
  • १० लाख रुपये माहेरून आणण्यासाठी विवाहितेचा छळ
  • मारहाण करून दीड वर्षाच्या मुलीसह घराबाहेर काढले
  • पोलिस अंमलदार पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिस दलात बीडीडीएस पथकात पोलिस अंमलदार असलेल्या पतीने १० लाखांच्या कर्जफेडीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा छळ केला, तसेच तिला मारहाण करून कपडे फाडले, दीड वर्षाच्या मुलीला हिसकावून घेत तिला घराबाहेर काढले आहे. हा प्रकार १० मे २०२३ ते १२ सप्टेबर २०२६ दरम्यान प्रतापगड नगरात घडला आहे. पती अंकुश भवर, सासू सरस्वती भवर, जेठ, निवृत्ती भवर आणि जाऊ संगीता भवर अशी विवाहीतेचा छळ करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात २९ वर्षीय पीडित विवाहीतेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीडितेचा १० मे २०२३ रोजी अंकुश भवर याच्याशी विवाह झाला. विवाहावेळी माहेरच्या मंडळींनी पाच लाख रुपये, सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी साहित्य दिले होते. सुरुवातीचे तीन महिने सासरच्यांनी चांगले वागवले. त्यानंतर पतीने चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण सुरू केली. सासू सरस्वती भवर हिनेदेखील घरगुती कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात केली. पती आणि सासूच्या त्रासामुळे अनेकदा माहेरी जावे लागत असे. दोन्ही कुटुंबांच्या बैठकीनंतर पुन्हा सासरी नांदण्यास जावे लागत होते.

कर्जाचा भार माहेरवर

दरम्यान, २७ डिसेंबर २०२४ रोजी पीडितेने मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्यानंतर पती आणि सासू तिला घेण्यासाठी आले नाहीत. नातेवाइकांनी समजूत घातल्यानंतर चार महिन्यांनी पती तिला आणि मुलीला घरी घेऊन गेला. त्यानंतरही सासूचा हस्तक्षेप आणि पतीचे संशयी वर्तन सुरूच राहिले. पत्नीच्या आईने जेवणातून काहीतरी दिल्याने आपल्याला चक्कर येते, पोट दुखते, असा संशयही पती व्यक्त करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पतीने लग्नापूर्वी कर्ज घेतले होते. त्याची परतफेड होत नसल्याचे सांगत पती आणि सासूने १० लाख रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावला. मात्र, वडील आठवडी बाजारात मसाले विकून उदरनिर्वाह करतात. लग्नातच त्यांनी पाच लाख रुपये दिले आहेत, आता एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे पीडितेने सांगितले. यानंतर पती आणि सासूकडून शारीरिक व मानसिक छळ वाढल्याचा आरोप आहे. जालना जिल्ह्यात राहणारे जेठ निवृत्ती भवर आणि जाऊ संगीता भवर हेही पती व सासूला फोन करून तिच्याविषयी चुकीची माहिती देत असल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

सासू-सासऱ्याला केली मारहाण

१२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी घरगुती कारणावरून पती अंकुश याने पीडितेशी वाद घातला. शिवीगाळ करीत तिला मारहाण केली. अंगावरील कपडे फाडून दीड वर्षाच्या मुलीला तिच्याकडून हिसकावून घेतले आणि घराबाहेर काढले. रस्त्यावर उभी असताना एका महिलेच्या मोबाइलवरून तिने आई-वडिलांना बोलावून घेतले. यावेळी पतीने त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. डोक्यात दगड मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमुद आहे.

हे सुद्धा वाचा : 18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

अखेर गुन्हा दाखल

या घटनेनंतर पीडितेने १२ सप्टेंबर रोजी सिडको पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला. तेव्हापासून ती मुलीसह माहेरी राहत आहे. त्यानंतर त्यांनी सिडको पोलिस ठाणे गाढून दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार भिमराव शेवगे करित आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विवाहितेचा छळ कोणी केला आणि कशासाठी?

    Ans: पती अंकुश भवर, सासू सरस्वती भवर, जेठ निवृत्ती भवर आणि जाऊ संगीता भवर यांनी १० लाख रुपये माहेरून आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

  • Que: विवाहितेला घराबाहेर का काढले?

    Ans: १२ सप्टेंबर २०२६ रोजी घरगुती कारणावरून पतीने वाद घालत तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडून दीड वर्षाच्या मुलीला हिसकावून घेत घराबाहेर काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पीडितेच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार भीमराव शेवगे करीत आहेत.

Web Title: An incident has occurred in which a police employee harassed his wife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हस्ते वाडी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण
1

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या हस्ते वाडी ग्रामीण रुग्णालयाचं लोकार्पण

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड
3

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; न्यायालयाने आरोपी भावाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; न्यायालयाने आरोपी भावाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.