
18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
दिनेश जाधव आणि प्रशांत राठोड यांनी हॉटेल सुरू केले होते. प्रशांतने भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत १८ लाख रुपये परत मागितले होते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. २८ ऑक्टोबर रोजी रात्री दिनेश हॉटेलमध्ये मोबाइलचा चार्जर घेण्यासाठी गेला होता. चार्जर घेऊन बाहेर आल्यानंतर तो दुचाकीजवळ पोहोचला असता प्रशांतने त्याच्याकडे भागीदारीचे पैसे परत मागितले. त्यानंतर प्रशांतने हातातील धारदार वस्तूने दिनेशच्या नाकावर वार केला. यात त्याचे नाक फॅक्चर झाले. यावेळी प्रथमेश, सागर आणि शिवराज ईधाटे यांनीही दिनेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी दिनेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड हादरलं! 18 व्या मजल्यावरुन आईने मुलासह मारली उडी; घटना CCTV मध्ये कैद
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात व छातीवर दगडाने प्रहार करून त्याचा निघृण खून करणाऱ्या आरोपीला बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी ३० ऑक्टोबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. व्यंकट बसवंत नक्कावार (वय ३२, रा. हनुमान हिप्परगा, ता. देगलूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याला पाच हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
Ans: ही घटना 28 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या N-5 सिडको येथील कॅनॉट प्लेस परिसरात घडली. तरुण हॉटेलमधून चार्जर घेऊन बाहेर येत असताना हल्ला झाला.
Ans: फिर्यादी दिनेश जाधव आणि आरोपी प्रशांत राठोड यांनी एकत्र हॉटेल सुरू केले होते. प्रशांतने भागीदारीतून बाहेर पडताना गुंतवलेले 18 लाख रुपये परत मागितले होते, याच पैशांच्या वादातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Ans: प्रशांत राठोड, प्रथमेश, सागर आणि शिवराज ईधाटे अशी चौघांची नावे आहेत. जखमी दिनेश जाधव (23, रा. गारखेडा) यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.