
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; न्यायालयाने आरोपी भावाला सुनावली 'ही' मोठी शिक्षा
२८ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास हनुमान हिप्परगा येथील बिरुदेव मंदिरासमोर ही घटना घडली होती. आरोपी व्यंकट याने अधिकची शेती वापरण्यासाठी असल्याच्या कारणावरून भाऊ संजय बसवंत नक्कावार यांच्याकडे त्यातील काही शेती देण्याची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून व्यंकट याने संजय यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर बसत डोक्यात व छातीवर दगडाने जबर मारहाण केली. यात संजय यांचा जागीच मृत्यू झाला.
मयताच्या पत्नीने देगलूर ठाण्यात दिली होती तक्रार
याप्रकरणी मयताची पत्नी गंगामणी नक्कावार यांच्या तक्रारीवरून देगलूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. के. मुंडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळ पंचनामा, जप्ती, एफएसएल अहवाल, प्रत्यक्षदर्शीचे जबाब आणि वैद्यकीय पुरावे संकलित केले. त्यानंतर सत्र खटला क्रमांक ७१/२०२३ अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायल मॉनिटरिंग सेलने या खटल्याचा नियमित पाठपुरावा केला. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शीची साक्ष आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप भिमराव कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. पैरवी अंमलदार शिवराज साखरे यांनी सहकार्य केले. ही माहिती पोलीस जनसंपर्क अधिकारी आशिष बोराटे यांनी दिली.
Ans: बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी व्यंकट बसवंत नक्कावार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, पाच हजार रुपये दंडही ठोठावला आहे.
Ans: २८ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील हनुमान हिप्परगा येथील बिरुदेव मंदिरासमोर ही घटना घडली होती.
Ans: अधिकची शेती वापरण्यासाठी मिळावी, यासाठी आरोपी व्यंकट याने भाऊ संजय यांच्याकडे काही शेतीची मागणी केली होती. याच कारणावरून झालेल्या वादातून त्याने संजय यांच्या डोक्यात व छातीवर दगडाने प्रहार करून त्यांची हत्या केली होती.