Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने जोरदार राडा केला आहे. रस्त्यावर आरडाओरडा करणाऱ्या या तरुणाला शांत राहण्याचा सल्ला दिला असता, त्याने थेट गस्तीवर असलेल्या पोलिसांशीच अरेरावी करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2026 | 01:56 PM
शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

नाशिक : कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनी परिसरात सोमवारी (दि. ३) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने जोरदार राडा केला आहे. रस्त्यावर आरडाओरडा करणाऱ्या या तरुणाला शांत राहण्याचा सल्ला दिला असता, त्याने थेट गस्तीवर असलेल्या पोलिसांशीच अरेरावी करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रोहित विनायक आढाव (२८, रा. आढाव मळा, गुरुदत्तनगर, जेलरोड, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्याचे अंमलदार घनश्याम प्रकाश भोये यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोये व त्यांचे सहकारी सोमवारी पहाटेच्या सुमारास ‘डीबी मोबाईल’ पथकासह परिसरात गस्त घालत होते. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास डिसूझा कॉलनीतील एका आलिशान दारू दुकानाबाहेर गर्दी दिसल्याने पोलिसांनी वाहन थांबवले. त्या ठिकाणी संशयित रोहित आढाव दारूच्या नशेत मोठ्याने आरडाओरड करत शांतता भंग करत होता. पोलिसांनी त्याला रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले, मात्र त्याने पोलिसांचे न ऐकता हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी पोलिसांना घाबरत नाही, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असे ओरडत त्याने पोलिसांना शिवीगाळ केली व कायदा-सुव्यवस्थेचा फज्जा उडवला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शासकीय वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले.

हे सुद्धा वाचा : आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर

डिसूझा कॉलनी परिसरातील बार, वाईट शॉप, कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये रात्री उशिरापर्यंत तरुणाईच्या पार्ट्या सुरू असतात. या आस्थापनांबाहेर होणारी बेशिस्त पार्किंग आणि मद्यधुंद टोळक्यांमधील वाद ही आता रोजचीच बाब झाली आहे. यापूर्वीही पोलिसांनी येथे कारवाया केल्या आहेत, मात्र तरीही रात्रीच्या वेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पूर्णपणे अंकुश लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या गल्लीत नियमित गस्त वाढवून ‘सरप्राइज चेकिंग’ करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Web Title: An incident has occurred where an intoxicated youth argued with the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.