Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांकडे तक्रार का दिली? म्हणत कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी; कळंब तालुक्यातील घटनेनं खळबळ

पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील लोहटा पश्चिम शिवारात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2026 | 12:55 PM
पोलिसांकडे तक्रार का दिली? म्हणत कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी; कळंब तालुक्यातील घटनेनं खळबळ

पोलिसांकडे तक्रार का दिली? म्हणत कोयत्याने वार, तरुण गंभीर जखमी; कळंब तालुक्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • तक्रार का दिली म्हणत तरुणावर कोयत्याने वार
  • तरुण गंभीर जखमी
  • कळंब तालुक्यातील घटनेनं खळबळ
कळंब : राज्यासह देसभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील लोहटा पश्चिम शिवारात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लोहटा (पश्चिम) येथील रहिवासी सुरेश रमेश चौधरी (वय ३२) हे ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गावातील शिवारात होते. त्यावेळी आरोपी अशोक गुणवंत आडसुळ (रा. लोहटा पश्चिम, ता. कळंब) हा तेथे आला. त्याने सुरेश चौधरी यांच्याकडे जाऊन, “माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार का दिली?” असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर अशोक आडसुळ याने सुरेश चौधरी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दोघांमधील वाद विकोपाला गेला असता, आरोपीने सोबत आणलेल्या कोयत्याने चौधरी यांच्या डाव्या हातावर जोरदार वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताच्या पोटरीजवळ खोलवर जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला.

हे सुद्धा वाचा : दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली

दरम्यान, घटनेनंतर जखमी सुरेश चौधरी यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अशोक आडसुळ याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. यापूर्वीही दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यात ऐन दिवाळीत गुन्हेगारीचा थरार!

कोंढवा बुद्रुक परिसरातील साळवे गार्डनजवळ वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शुभम शरद शिंदे (वय २७, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रतन विठ्ठल खत्री (वय २४), सोमा गायकवाड, पंकज तिवारी, आकाश जमादार यांना अटक करण्यात आली. तर बंटी म्हस्के, समीर विद्यागज, संघर्ष सावंत, शैलेश भंगे, तन्मय सोनवणे यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लोहटा पश्चिम येथे नेमके काय घडले?

    Ans: पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून झालेल्या वादातून अशोक आडसुळ याने सुरेश चौधरी यांच्या डाव्या हातावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात सुरेश चौधरी गंभीर जखमी झाले.

  • Que: ही घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: ही घटना 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील लोहटा पश्चिम शिवारात घडली.

  • Que: याप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: जखमी सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात संशयित अशोक आडसुळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: An incident involving an attack on a young man has taken place in kalamb taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharahtra

संबंधित बातम्या

दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली
1

दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…
3

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…

मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल
4

मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.