
दारू पिऊन कामावर आला, नोकरी गेली; संतापलेल्या कामगाराने कंपनीलाच आग लावली
सागर चंद्रकांत पुरी (वय ३२, रा. गजानननगर, गारखेडा परिसर) यांची वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी शिवारातील गट क्रमांक ६१ मध्ये युरोटेक इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. शेरखान पठाण (वय ५०, रा. आझाद चौक, जिन्सी) हा त्यांच्या कंपनीत कामाला होता. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शेरखान दारू पिऊन कामावर आला. त्यामुळे पुरी यांनी त्याला त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता शेरखानने पुरी यांना फोन केला. कंपनीतील सामानाला आग लावून नुकसान करण्याची धमकी त्याने दिली. पुरी यांनी त्याला याबाबत विचारणा केली; मात्र त्याने काहीही उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी कंपनीतील कामगार रमेश वाघमारे आणि शाकीर शेख यांनी पुरी यांना फोन करून कंपनीचे शटर उचकटलेले असून आतील साहित्य जळाल्याचे कळविले.
माहिती मिळताच पुरी यांनी मित्र अक्षय ताठे यांच्यासह कंपनी गाठली. कंपनीचे समोरील शटर वाकवलेल्या अवस्थेत होते. आत पाहणी केली असता ९० हजार रुपये किमतीचा ए.आर.पी. कुलिंग टॉवर जळाल्याचे दिसून आले. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हे सुद्धा वाचा : मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल
सीसीटीव्ही फुटेजने उघड केला प्रकार
घटनेनंतर पुरी यांनी कंपनीच्या पाठीमागे असलेल्या गजानन अॅग्रो कंपनीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ७ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास शेरखान पठाण कुलिंग टॉवरला आग लावताना स्पष्टपणे दिसून आला. या फुटेजच्या आधारे पुरी यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शेरखान पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Ans: दारू पिऊन कामावर आल्यामुळे नोकरीवरून काढल्याचा राग मनात धरून कामगार शेरखान पठाण याने कंपनीतील साहित्याला आग लावली.
Ans: या आगीत कंपनीचा ९० हजार रुपये किमतीचा ए.आर.पी. कुलिंग टॉवर जळून खाक झाला.
Ans: शेजारील गजानन अॅग्रो कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेरखान पठाण आग लावताना दिसून आला. त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला.