Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

दारूच्या नशेत एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हल्ल्यात झाले. दोघांनी मिळून डिलिव्हरी बॉय तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 06, 2026 | 04:37 PM
‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • ‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला
  • डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार
  • उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
पुणे : दारूच्या नशेत एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हल्ल्यात झाले. दोघांनी मिळून डिलिव्हरी बॉय तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना रविवारी (४ ऑक्टोबर) रात्री उत्तमनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आदित्य गुलाब कांबळे (वय २३, रा. कोंढवे धावडे) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या प्रकरणी सागर प्रदीप कोठारी (वय २२, रा. इस्कॉन मंदिराजवळ, उत्तमनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. कोठारी याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य कांबळे यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य कांबळे हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रविवारी रात्री दहाच्या सुमारास तो आपल्या मित्रासोबत उत्तमनगर येथील श्री भवानी माता मंदिर चौकात थांबला होता. त्यावेळी सागर कोठारी आणि त्याचा अल्पवयीन मित्र दारूच्या नशेत तेथे आले. यावेळी एकमेकांकडे पाहण्यावरून आदित्य आणि आरोपींमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी आदित्यला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान सागर कोठारी याने आदित्यच्या डोक्यात कोयत्याने वार केला. या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला.

हे सुद्धा वाचा : रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यानंतर पसार झालेल्या सागर कोठारी याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. जखमी आदित्यवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सागर कोठारी याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.

Web Title: An incident involving the assault of a young man has occurred in uttamnagar pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
1

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
2

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
3

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
4

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.