Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

Murder News: दोन दिवसांपूर्वीच गावी आलेला तरुण, भर लग्नात वाद अन् टोळक्याचा धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला! जळगावच्या बोरनारमध्ये २१ वर्षीय प्रेम धनगरचा खून; ५ जणांना अटक, सर्व आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 19, 2026 | 04:34 PM
Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा... २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा... २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

Follow Us
Follow Us:
  • भर लग्नात टोळक्याच्या हल्ल्यात २१ वर्षीय प्रेम धनगरची हत्या
  • शिवीगाळ केल्याच्या गैरसमजातून धारदार शस्त्राने वार
  • पाच जणांना अटक; उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेह न घेण्याचा पवित्रा
Murder News: आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असलेल्या भर लग्नसमारंभातच एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे घडली आहे. प्रेम गोपाल धनगर असे मृत तरुणाचे नाव असून, या रक्तरंजित घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: PSI Bribe: गुन्ह्यात सहआरोपी करीन… भीती दाखवून मागितले २५ हजार; लाच घेतानाच PSI शरद खाडे थेट एसीबीच्या जाळ्यात!

दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता प्रेम 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा गेल्या काही महिन्यांपासून कामानिमित्त अमळनेर येथे वास्तव्यास होता आणि अवघ्या दोन दिवसांपूर्वीच तो बोरनार येथील आपल्या गावी परतला होता. बुधवारी रात्री तो गावातील एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. लग्नाच्या धामधुमीतच त्याचा काही तरुणांशी वाद झाला. त्यानंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने प्रेमला घेरून बेदम मारहाण केली. या झटापटीत टोळक्यातील एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा वार केला. या हल्ल्यात प्रेम गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

गैरसमजातून तरुणाला संपवल्याचा आरोप

भर लग्नात घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेमागे गैरसमजाचे कारण पुढे येत आहे. लग्नसमारंभात प्रेमचा दुसऱ्या एका तरुणाशी वाद सुरू होता. मात्र, हल्लेखोरांनी प्रेम आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करून घेतला आणि त्यातूनच चिडून त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा जीव घेतला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा: Suicide Case: इन्स्टाग्रामवरील प्रेम अन् लिव्ह-इन नात्याचा भयावह अंत! पार्टनरच्या टोमण्यांना कंटाळून २४ वर्षीय तरुणी…

पाच जणांना अटक; नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम

या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्ल्यात सहभागी असलेल्या उर्वरित सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीवर नातेवाईक ठाम राहिल्याने रुग्णालयात मोठी गर्दी जमली आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतरही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्याबाबत काय निर्णय घेतात आणि पोलीस उर्वरित आरोपींच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगावच्या बोरनार येथे २१ वर्षीय तरुणाचा खून कसा झाला?

    Ans: बुधवारी रात्री गावातील लग्नसमारंभात झालेल्या वादानंतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने प्रेम गोपाल धनगर याला घेरून मारहाण केली आणि धारदार शस्त्राने जीवघेणा वार करून त्याची हत्या केली.

  • Que: या हल्ल्यामागे कोणते कारण सांगितले जात आहे?

    Ans: लग्नात दुसऱ्या तरुणाशी वाद सुरू असताना प्रेम आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज हल्लेखोरांनी करून घेतल्यामुळे हा हल्ला झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

  • Que: याप्रकरणी पोलिसांची कारवाई काय झाली आणि नातेवाईकांची भूमिका काय आहे?

    Ans: पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे; मात्र हल्ल्यातील उर्वरित सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर नातेवाईक ठाम असल्याने जिल्हा रुग्णालयात तणाव आहे.

Web Title: Jalgaon bornar wedding murder prem dhangar 21 year old five arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • crime news
  • murder case news

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार
2

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार
3

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…
4

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.