Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल

टोळीने बंद घरांचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते. या टोळीविरुद्ध घरफोडीचे पाच गंभीर गुन्हे दाखल असून, परिसरात दहशत निर्माण झाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 19, 2026 | 01:37 PM
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल

Follow Us
Follow Us:
  • नांदेड जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील १२ सराईत गुन्हेगार तडीपार.
  • खंडणी, घरफोडी आणि गोवंश तस्करीसह विविध गुन्ह्यांमध्ये टोळ्यांचा सहभाग.
  • भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार.
नांदेड : जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी कठोर पाऊल उचलले असून, भाग्यनगर आणि धर्माबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १२ सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्यातून तडीपार करण्याचे अंतिम आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर तीन टोळ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पाच जणांच्या टोळीला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये शिला भदरगे (वय ४२, बेलानगर), इंदुबाई बाराटे (वय ३५, संतोषनगर), आमन कांबळे (वय २०, पालीनगर), रेखा पुरी (वय ३५, विजयनगर) आणि सुनीता सोनकांबळे (वय ४०, साईगिरीनगर) यांचा समावेश आहे. या टोळीतील सदस्य नागरिकांना फोन करून कामाचे आमिष दाखवत बोलावून घेत असत. त्यानंतर मारहाण करून अंगावरील कपडे काढून व्हिडिओ शूटिंग करणे, तो व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होते.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आणखी पाच जणांना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अर्जुन पुरुषोत्तम मोरे (वय २८, मरघाट), सोहेल अ. सत्तार (वय १९, जवाहरनगर), दीपकुमार वीरकुमार कौरी (वय २०, बळीरामपूर), आशा हरिचंद्र तेलंग (वय ५५, शाहनगर) आणि शेख नईम शेख मैनोद्दीन (वय २१, कैलासनगर) अशी त्यांची नावे आहेत. या टोळीने बंद घरांचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते. या टोळीविरुद्ध घरफोडीचे पाच गंभीर गुन्हे दाखल असून, परिसरात दहशत निर्माण झाली होती.

गोवंश तस्करी करणाऱ्या दोघांवरही कारवाई

धर्माबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अजीम गौसोद्दीन कुरेशी (वय ४०, करखेली) आणि दत्ता किशन शिलगिरे (वय ३८, करखेली) या दोघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना वाहनात निर्दयपणे कोंबून अवैध वाहतूक केल्याचे या टोळीवर आरोप आहेत. महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत त्यांच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार आहे.

FAQ

Q1. नांदेड जिल्ह्यात किती सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले?
जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

Q2. कोणत्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील टोळ्यांवर कारवाई करण्यात आली?
भाग्यनगर आणि धर्माबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

Q3. भाग्यनगरमधील टोळीतील किती जणांना तडीपार करण्यात आले?
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच जणांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

Web Title: Major action by nanded police 12 habitual offenders from district externed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • crime news
  • nanded news

संबंधित बातम्या

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार
1

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार
2

1 कोटींचे कर्ज, व्याजासह 3 कोटींची मागणी; लातुरात अवैध सावकारीचा गंभीर प्रकार

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…
3

पैशाच्या वादातून तरुणाची हत्या; अपहरण करून निर्जनस्थळी नेलं अन् नंतर…

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
4

मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.