Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

खराडी गावठाणातून तरुणाला कारमध्ये जबरदस्तीने घालून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जिवे मारण्याची धमकी देत बेल्ट आणि काठीने मारहाण करून त्याला जखमी केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2026 | 04:48 PM
खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्...

खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता खराडी गावठाणातून तरुणाला कारमध्ये जबरदस्तीने घालून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. जिवे मारण्याची धमकी देत बेल्ट आणि काठीने मारहाण करून त्याला जखमी केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 

याप्रकरणी शुभम नामदेव खवळे (वय २०), साई नामदेव खवळे (वय १८, दोघे रा. हडपसर), १७ वर्षांचा विधीसंघर्षित बालक व त्यांचे सात मित्र, यांच्यावर खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्लोक प्रमोद मोरे (वय १९, रा.  खराडी गावठाण, मूळ रा. राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी तक्रार दिली आहे. दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता खराडी गावठाणातील बुद्धविहारासमोर ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले. त्यांनी संगनमत करून मोरे यांना जबरदस्तीने कारमध्ये घातले. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. त्यानंतर शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची भाषा केली. कमरेच्या बेल्टने आणि काठीने मारहाण करून मोरे यांना जखमी करण्यात आले. दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी या प्रकरणाची नोंद झाली. आरोपींसोबतच्या सात मित्रांची पूर्ण नावे अहवालात देण्यात आलेली नाहीत.

हे सुद्धा वाचा : एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Web Title: An incident involving the kidnapping of a young man has occurred in the kharadi gaothan area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
1

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
2

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई
3

Katraj Tunnel Robbery: कात्रज बोगद्याजवळ दाम्पत्याला लुटणारे चोरटे अटकेत; पोलिसांची मोठी कारवाई

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
4

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.