
नागपुरात भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावरच हल्ला, लोखंडी कडा अन् दगडाने मारहाण; नेमकं काय घडलं?
अमन उत्तम मेश्राम (वय २५, रा. पडोळेनगर, वाठोडा रोड) आणि अश्लेष शिवशंकर अडिकने (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत. देवेंद्र आणि दोन्ही आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. ते अनेकदा एकत्र बसून मद्यपान करतात. घटनेच्या दिवशी दुपारी १ वाजता तिघेही संघर्षनगर – रोडवरील देशी दारूच्या दुकानात मद्यपान करण्यासाठी गेले होते. दारूच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर अमन आणि अश्लेष यांनी देवेंद्र यांचा मित्र पिंटू कांबळे याच्याशी वाद घालून शिवीगाळ सुरू केली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद वाढत गेला. हा वाद मिटवण्यासाठी देवेंद्र यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ही मध्यस्थीच दोघांना खटकली. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी त्यांनाच लक्ष्य केले.
अमन आणि अश्लेष यांनी देवेंद्र यांना मारहाण सुरू केली. अश्लेषने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर वार केला. एवढ्यावरच न थांबता दोघांनी दगडानेही मारहाण केली. या हल्ल्यात देवेंद्र यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमी देवेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी देवेंद्र यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमन मेश्राम आणि अश्लेष अडिकने यांना अटक केली. मद्यपानातून झालेल्या या वादामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : शेतात धान कापणी करताना वाघाचा अचानक हल्ला; तरुणाचा उपचारासाठी नेताना मृत्यू
Ans: मित्राचा वाद सोडवायला गेलेल्या देवेंद्र सावरकर यांच्यावर अमन मेश्राम आणि अश्लेष अडिकने यांनी लोखंडी कड्याने आणि दगडाने हल्ला केला. यात त्यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले.
Ans: देशी दारूच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी देवेंद्र यांचा मित्र पिंटू कांबळे याच्याशी वाद घालून शिवीगाळ सुरू केली. हा वाद मिटवायला गेले असता देवेंद्र यांच्यावरच हल्ला झाला.
Ans: नंदनवन पोलिसांनी दोन्ही आरोपी अमन मेश्राम (25) आणि अश्लेष अडिकने (29) यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.