Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात पोलिस चौकीत शिपायाला धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

मंगळवार पेठेतील गाडीतळ चौकीत गोंधळ घालून पोलिस शिपायाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 01:41 PM
पुण्यात पोलिस चौकीत शिपायाला धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

पुण्यात पोलिस चौकीत शिपायाला धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : मंगळवार पेठेतील गाडीतळ चौकीत गोंधळ घालून पोलिस शिपायाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संतोष विठ्ठल खंकाळ (वय ५३, रा. लोकसेवा तरुण मंडळाजवळ, मंगळवार पेठ) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई प्रशांत तुर्डे यांनी फरासखाना पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवार पेठेत वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्याने गाडीतळ पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी आरोपीला १४ मार्च रोजी दुपारी बोलावून घेतले होते. ’तू मला बोलावून घेतले. तू साधा पोलिस शिपाई आहे. तुला तपासाचा अधिकार नाही’, अशी अरेरावी करून आरोपीने पोलिस शिपाई तुर्डे यांच्याशी वाद घातला.

तुर्डे यांना धक्काबुक्की करण्यात आली. तर, चैाकीच्या आवारात गोंधळ घातला. ‘तुझ्याविरुद्ध माझ्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत. तू मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवतो. तुझी तक्रार पोलिस आयुक्तांकडे करून नोकरी घालवतो’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रणिल चौगले करत आहेत.

हे सुद्धा वाचा : शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

वर्गात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील गाडगे महाराज परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून, त्याने प्रसंगावधान राखून वार हातावर झेलल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार रोजी दहावीचा इतिहास विषयाचा पेपर होता. ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थी गाडगे महाराज परिसरातील परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी वेळेत पोहोचला होता. सर्व विद्यार्थी आपापल्या बाकावर बसून परीक्षेची तयारी करत असतानाच, अचानक एक १७ वर्षीय अनोळखी मुलगा वर्गात शिरला. कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने आपल्या दप्तरातून धारदार कोयता बाहेर काढला आणि संबंधित विद्यार्थ्याच्या दिशेने जोराने वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला. ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे.

Web Title: An incident of a police constable being pushed at a police post in pune has taken place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.