Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी

विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना बसला झालेल्या अपघातामुळे शालेय वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2026 | 01:11 PM
मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी

मोठी बातमी ! सुपे घाटात विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस उलटली; 4 विद्यार्थी जखमी

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला बुधवारी (दि. १६) सकाळी अपघात झाला. विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस घाटातील पहिल्या वळणावर नियंत्रण सुटल्याने पलटी झाली. या बसमध्ये सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करत होते. अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पाटस मार्गावरून कुसेगाव, पडवी तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन एस. टी महामंडळाची बस सुप्याच्या दिशेने निघाली होती. सकाळी साडेसातच्या सुमारास सुपे घाटातील पहिल्या वळणावर बस चढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस दोन पलट्या घेत रस्त्याच्या बाजूला खाली गेली. या ठिकाणी रस्त्यालगत संरक्षक कठडा नसल्याने अपघाताची तीव्रता वाढली , यात बस पलटी झाली.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती शाळेचे योगेश पाटील यांनी दिली.

शालेय वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या बसची नियमित तांत्रिक तपासणी केली जाते का, बसचे ब्रेक, टायर, इंजिन आणि अन्य यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.

यंत्रणांकडून घटनेची चौकशी करावी

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बससाठी दररोजचा सुरक्षा तपासणी अहवाल ठेवण्यात यावा, अशीही मागणी पुढे आली आहे. त्याचबरोबर सुपे घाटातील अपघातप्रवण वळणावर संरक्षक कठडा आणि अन्य आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना बसला झालेल्या अपघातामुळे शालेय वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांकडून या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

युगेंद्र पवार यांची घटनास्थळी भेट

या अपघाताची माहिती मिळताच विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांकडून अपघाताची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांशी देखील त्यांनी चर्चा केली.

Cape Verde Accident : केप वर्देच्या फोगो बेटावर भीषण बस अपघात; २५ जणांचा मृत्यू, अनेक मुले-बालकांचा समावेश

Web Title: An st bus packed with students overturned in supe ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • baramati news
  • Bus Accident

संबंधित बातम्या

Baramati News: ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’! अनंत राऊत यांच्या कवितांनी बारामतीकरांच्या मनाला घातली साद
1

Baramati News: ‘मित्र वणव्यात गारव्यासारखा’! अनंत राऊत यांच्या कवितांनी बारामतीकरांच्या मनाला घातली साद

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली
2

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’
3

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.