Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. गॅंगवॉरच्या युद्धातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2025 | 06:57 PM
Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातील कोंढव्यात रंगला थरार 
रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या 
आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध पेटले

Crime News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. गॅंगवॉरच्या युद्धातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. कोंढवा भागात रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.

कोंढवा भागात एका रिक्षा चालकाची हत्या झाली आहे. हा रिक्षाचालक कोमकर टोळीतील सदस्याचा भाऊ असल्याचे समोर आले आहे. ही हत्या टोळीयुद्धातून झाल्याचे म्हटले जात आहे. पुण्यातील कोंढवा भागात दिवसाढवळ्या हत्या झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या

दोन टोळ्यांच्या संघर्षातून आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर पसार झालेल्या बंडू आंदेकर टोळीतील सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे. दत्ता बाळू काळे (वय २४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने केली आहे.

बंडू आंदेकर टोळीतील आणखी एका गुंडाला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून सापळा रचून पकडले

एक वर्षांपुर्वी (दि. १ सप्टेंबर २०२४) रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा टोळी युद्धातून सोमनाथ गायकवाड व त्याच्या टोळीने खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून केला होता. त्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई केली होती. या टोळीतील काही जण अद्यापही पसार आहेत. दरम्यान, सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराइत दत्ता काळेने पाळत ठेवली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. काळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबला होता. याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी महेश बारावकर, मंगेश पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून काळेला पकडले. वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती.

 

Web Title: Andekar komkar gangwar murder to auto driver pune kondhwa police marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune

संबंधित बातम्या

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?
1

जावळीत मुबंई पोलिसांची मोठी कारवाई! ​एमडी ड्रग्जची पाळेमुळे जावळीपर्यंत पोहचली कशी?

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

मावळ हादरलं! 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले
3

Chhatrapati Sambhajinagar Cyber Fraud: NSE च्या नावावर ‘ट्रेडिंग’चा खेळ! बँक अधिकाऱ्याला २६ लाखांना गंडवले

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
4

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.