Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर तुम्ही असं कधीच म्हटलं नसतं.’; वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे प्रत्युत्तर

परळीत वातावरण तापलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमधून वाल्मिक कराडच्या आईलाही अनेक प्र्श्न विचारले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 14, 2025 | 02:38 PM
अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?

अंजली दमानियांच्या नव्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
Close
Follow Us:

बीड:  सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेले  वाल्मिक कराड यांच्या आई पार्वताबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. “माझा लेक देवमाणूस आहे, त्याला मुद्दाम अडकवले जात आहे. त्याला सोडेपर्यंत मी इथून हटणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि विरोधकांनी वाल्मिक कराड यांच्यावर मकोका आणि कलम 302 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बीड आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. परळीत वाल्मिक कराड यांना न्याय द्या, या मागणीसाठी त्यांच्या मातोश्री पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत असतानाच, कराड समर्थकांनी टाॅवरवर चढून आंदोलनही केले.

पार्वताबाईंच्या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. “कराड यांच्या आईला आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’असे कधीच म्हटले नसते.”

परळीत वातावरण तापलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमधून वाल्मिक कराडच्या आईलाही अनेक प्र्श्न विचारले आहेत. वाल्मिक कराडच्या आईला उद्देशून केलेल्या या पोस्टमध्ये, ” वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात ह्याची कल्पना तुम्हाला असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’ असे कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पहावी ही विनंती. त्यांच्यावर ह्याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पहावा. आपल्याला काही प्रश्न.

काय म्हटलं आहे अंजली दमानिया यांनी ?

१. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?

२. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?

३. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?

४. संतोष मुंडे ह्याच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का ?

५. आवादा कंपनीचे लोक ह्यानी केलेला FIR खोटा आहे का ?

६. गोट्या गित्ते सारखी माणसं सदगृहस्त आहेत का ?

एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ ह्या पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला, आईने काय करायला हवं, ते आपण पाहा संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही ?”

Web Title: Anjali damanias reply to valmik karads mother nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • crime news
  • Santosh Deshmukh Case
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी
1

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी

तुझं प्रमोशन करतो, पगार वाढवतो, त्या बदल्यात मला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
2

तुझं प्रमोशन करतो, पगार वाढवतो, त्या बदल्यात मला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल
3

Navi Mumbai : नवरात्रोत्सवात नियमांचे उल्लंघन; नेरूळ पोलिसांची कारवाई,ध्वनी प्रदूषण प्रकरणी चार मंडळांवर गुन्हा दाखल

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 3 कोटींना गंडा; 11 जणांवर गुन्हा दाखल
4

गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 3 कोटींना गंडा; 11 जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.