Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

97 साक्षीदार, 2 वर्ष सुनावणी…! अंकिता भंडारी हत्या प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Ankita Bhandari Case: उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील सुमारे दोन वर्षे आणि आठ महिने चाललेल्या खटल्यानंतर हा निकाल आला आहे. अखेर तिन्ही आरोपींना दोषी घोषित करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2025 | 12:53 PM
अंकिता भंडारी हत्या प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी (फोटो सौजन्य-X)

अंकिता भंडारी हत्या प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Ankita Bhandari Case In Marathi : उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील सुमारे दोन वर्षे आणि आठ महिने हे प्रकरण कोर्टात सुरु होतं. अखेर आज (30 मे) कोर्टाने या प्रकरणात अंकिता भंडारीला न्याय मिळून दिला. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दोषी म्हणून घोषित करण्यात आले. अंकिता भंडारी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. ज्या हॉटेलमध्ये अंकिता रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती त्या हॉटेलच्या मालकावर १९ वर्षीय अंकिता भंडारीच्या हत्येचा आरोप आहे. अंकिता भंडारी कोण होती आणि या प्रकरणात आतापर्यंत काय घडले आहे , जाणून घ्या सविस्तर बातमी…

अंकिता भंडारी श्रीनगर गढवाल येथील रहिवासी होती आणि ती एका सामान्य कुटुंबातील होती. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली. तिला ऋषिकेशमधील वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी मिळाली पण त्यानंतर काही दिवसांनी तिची हत्या करण्यात आली. अंकिताची १८ सप्टेंबर २०२२ रोजी तिची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला.

मोलकरणीचे प्रेमासाठी वाट्टेल ते ! मालकाचा विश्वासघात केला अन् केलं असं काही की…

या हत्येनंतर रिसॉर्ट मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वनंतरा रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, रिसॉर्टचे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहाय्यक व्यवस्थापक अंकित उर्फ ​​पुलकित गुप्ता यांना अटक केली होती. अंकिताची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह चिला कालव्यात फेकण्यात आला होता. आरोपींनी अंकित भंडारीची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची कबुली दिली होती. अंकिताच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू बुडून झाल्याचे आणि तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, अंकिता भंडारी हत्या प्रकरणात कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रीना नेगी यांनी पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना दोषी ठरवले आहे. तिघांचीही शिक्षा अद्याप जाहीर झालेली नाही. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिता भंडारी यांची १८ सप्टेंबर २०२२ रोजी हत्या करण्यात आली होती.

सोमवारी बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांमधील अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ३० मे रोजी निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एसआयटीने ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये एकूण ९७ साक्षीदारांची नावे होती. यापैकी ४७ साक्षीदारांना सरकारी वकिलांनी न्यायालयात हजर केले. एसआयटीने न्यायालयात दाखल केलेल्या ५०० पानांच्या आरोपपत्रात पुलकित आर्यने त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांच्यासह ही हत्या केल्याचे म्हटले आहे.

या खटल्याची सुनावणी दोन वर्षे आठ महिने चालली आणि या काळात तपास अधिकाऱ्यासह ४७ साक्षीदारांना सरकारी वकिलांनी हजर केले. अंकिताचा पुलकितशी वाद झाला, त्यानंतर भास्कर आणि गुप्ता यांच्यासह पुलकितने अंकिताला ऋषिकेशमधील चिला कालव्यात ढकलल्याचा आरोप आहे.

अंकिताचा मृतदेह कालव्यात सापडल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले. पुलकित हा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) तत्कालीन नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पक्षाने आर्य यांना पक्षातून काढून टाकले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आणि लोकांना शांत करण्यासाठी राज्य सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे लागले. सरकारने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची घोषणाही केली.

Vaishnavi Hagawane Case: एमजी हेक्टर दिली तर गाडी पेटवून देईन..; वैष्णवीच्या वडिलांनी थेट पुरावेच दाखवले

Web Title: Ankita bhandari murder case justice after three years all three accused found guilty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
3

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…
4

Chhattisgarh Crime: एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणाने रचला मोठा कांड; इंटरनेटवर पाहून बॉम्ब तयार केले आणि पॅकेट तयार करून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.