Santosh Deshmukh murder accused walmik Karad given VIP treatment in Beed Jail
बीड: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभरातील संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यभरातून होतं आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. अटकेत असलेल्या आरोपींची सीआयडी चौकशीही सुरू आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. पण हळहळु कराडचे कारनामे समोर येऊ लागलेत.
अमर पालकर नावाच्या शेतकऱ्याने वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात हार्वेस्टर मशिनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रूपये घेण्यात आल्याचा दावा पालकर यांनी केला आहे. अमर पालकर यांच्या म्हणण्यानुसार, 14 सप्टेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना भेटून अनुदानासाठी पैसे दिल्याची माहिती देण्यात आली होती. मुंडे यांनी लवकरच अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
राज्यातील 141 हार्वेस्टर मालकांनी प्रती हार्वेस्टर 8 लाख रुपये वाल्मिक कराडला दिले होते. परळी आणी पनवेल मध्ये हे पैसै देण्यात आले होते. नवी मुंबईतील पनवेल येथील देवीस रेसिडेन्सीमधील 17 नंबरच्या रूममध्ये वाल्मिक कराड, नामदेव सानप, व जितु पालवे या तिघांकडे पैसै दिल्याचे पालकर यांनी सांगितलं आहे. पैसे दिल्यानंतरही अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, त्यांना धमक्या व मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांनी पुढील कारवाई न झाल्यास मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कल्पना असून, त्यांनी दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या मॅनेजरने गंभीर आरोप केले आहेत. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीनेच सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे.
लग्नसराईत नवरीच्या पायात शोभून दिसतील ‘या’ सुंदर चांदीच्या जोडव्या, पाय दिसतील अधिक
सुशील कराडचे साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरूद्धही खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पिडीत मॅनेजरच्या पत्नीने सुशील कराडसह त्याच्या दोन्ही साथीदारांविरोधात सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही, अशीही माहिती समोर आली आहे.