Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dalit Woman Murder: धक्कादायक! दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव; नेमकं कारण काय?

Dalit Woman Murder in Kapsad Village: गावात दलित महिलेची हत्या आणि मुलीचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. १० पोलीस पथके मुलीचा शोध घेत असून, राजकीय पक्षांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 09, 2026 | 07:43 PM
दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव (Photo Credit- X)

दलित महिलेची निर्घृण हत्या त्यानंतर लेकीचे अपहरण, गावात प्रचंड तणाव (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • दलित महिलेची निर्घृण हत्या
  • मुलीचे अपहरण केल्याने गाव पेटले
  • राजकीय वातावरण तापले
Dalit Woman Murder News: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरधना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कापसाड गावात एका दलित महिलेची हत्या आणि तिच्या मुलीच्या अपहरणामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. गेल्या ३० तासांपासून या गावात अशांतता असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

कापसाड गावातील रहिवासी सुनीता आणि त्यांची मुलगी गुरुवारी सकाळी घरी परतत असताना, गावातीलच पारस राजपूत नावाच्या तरुणाने त्यांना अडवले. मृत सुनीता यांचे पती सतेंद्र यांच्या माहितीनुसार, पारसने त्यांच्या मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. जेव्हा सुनीता यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रतिकार केला, तेव्हा संतापलेल्या पारसने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनीता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, संधी मिळताच पारसने त्यांच्या मुलीला जबरदस्तीने पळवून नेले.

ग्रामस्थांचा अंत्यसंस्कारास नकार; गावात तणाव

या घटनेनंतर दलित समाज आक्रमक झाला असून, गेल्या ३० तासांपासून सुनीता यांचा मृतदेह गावातच ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत पोलीस मुलीला सुरक्षित परत आणत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबाने घेतली आहे. संतप्त जमावाने मृतदेह घेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेची तोडफोड केली असून, शवविच्छेदन करण्यासही विरोध दर्शवला आहे.

Suicide News: कोर्ट परिसरात धक्कादायक घटना! तरुणांने उडी मारून केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा

आरोपीचा दावा आणि प्रेमप्रकरणाचा अँगल

दुसरीकडे, आरोपी पारस राजपूतच्या कुटुंबाने वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पारस आणि त्या मुलीचे प्रेमसंबंध होते आणि मुलीनेच त्याला फोन करून बोलावले होते. वादावादी दरम्यान मुलीनेच तिच्या आईवर कुऱ्हाडीने वार केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, पोलीस सर्व कोनातून तपास करत असून, सध्यातरी हत्येच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय नेत्यांची एन्ट्री आणि ‘बांगड्या’ फेकून निषेध

या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ‘बांगड्या’ फेकून पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा निषेध केला. भीम आर्मीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी पीडित कुटुंबाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आणि “पोलिसांची गुंडगिरी खपवून घेणार नाही” असा सज्जड दम प्रशासनाला दिला. सरधनाचे आमदार अतुल प्रधान यांना पोलिसांनी गावात प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी गावाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले आहे.

पोलीस प्रशासन काय म्हणते?

एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, मुलीची सुरक्षित सुटका करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. “आम्ही १० पोलीस पथके तैनात केली असून आरोपीच्या शोधासाठी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. लवकरच मुलीचा शोध लागेल,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

Web Title: Shocking meerut dalit woman murder daughter kidnapped tension in village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • crime news
  • crime news marathi
  • Meerut Murder Case
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
1

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

Crime News : मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार
2

Crime News : मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार

चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्…
3

चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्…

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू
4

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.