बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, सतीश भोसले प्रकरणांमुळे बीडमधील गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. बीडमधील या घटनांमुळे बीड बिहार बनले आहे की काय, असा प्रश्न राज्यभरातून उपस्थित होऊ लागला आहे. या घटनेमुळे बीडचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. कोर्टाच्या बाहेर गोंधळ झाल्याने चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये वारंवार हिंसक घटना घडत असून, दररोज मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ताज्या घटनेत, धारूर न्यायालय परिसरात मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जमिनीच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची वाढती संख्या पाहता, कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असल्याने “बीडचा बिहार झाला आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
smishing अटॅक म्हणजे काय? Android आणि iPhone युजर्स वेळीच सावध व्हा, तुमचे बँक अकाउंट होईल सेकंदात
अशातच धारूर तालुक्यातील तालुका न्यायालय परिसरात जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांमध्ये जमिनीच्या वादावरून तणाव होता. हा वाद सोडवण्यासाठी ते न्यायालयाच्या परिसरात आले होते. मात्र, चर्चा सुरू असताना वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या झटापटीत एका गटाने एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी तसेच बेल्टने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना जिल्हा सत्र न्यायालयात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. जमावाकडून एका व्यक्तीला मारहाण केल्याचे आढळून आले असून, या प्रकरणी धारूर पोलिसांनी सुमोटो कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धारूर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. राजकीय नेत्यांचे आश्रय असलेल्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, बीडमध्ये आणखी एका मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दोन गट परस्परांशी भिडताना दिसत आहेत. सहा ते सात जण एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते. विशेष म्हणजे, ही घटना थेट बीडच्या धारूर न्यायालयाच्या परिसरात घडल्याने सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच नातेवाइकांनी केलं असं काही… डोक्याला हात लावून रडू लागला नवरदेव;