(फोटो सौजन्य:Instagram)
लग्नसमारंभ म्हटलं की त्यात अनेक मजेदार गोष्टी घडत असतात. एकाच लग्नात अनेक मजेदार गोष्टी घडून येतात ज्या बऱ्याचदा हास्यास्पदही ठरतात. लग्नातील डान्स परफॉर्मन्स, पाहुण्यांमधील वादावादी आणि नवरा नवरीचे कंटाळलेले चेहरे असे बरेच लग्नातील दृश्य तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. हे असे व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करतात ज्यामुळे कमी वेळात ते व्हायरलही होतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील नवरदेवाची परिस्थिती पाहून तुम्हाला त्याच्यावर दया येईल. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
लग्नात नवरदेवाला आणि नवरीला त्रास देण्यासाठी अनेक योजनांचे आयोजन केले जाते. ही मिश्किल मज्जा लग्नाचा समारंभ आणखीन मजेदार बनवतात मात्र सध्याच्या व्हिडिओत नातेवाइकांनी जो पराक्रम केला तो याहून तुम्ही आवाक् व्हाल. व्हिडिओत तुम्हाला निराश झालेला नवरदेव दिसून येईल. यात नक्की काय घडलं ते आता सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
एका नवविवाहित जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नाच्या रात्रीच्या सर्व इच्छा भंग पावताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वधू आणि वर लग्नानंतर एका खोलीत बसलेले दिसत आहेत. यावेळी नवरदेव खोलीच्या एका कोपऱ्यात निरशाजनक नजरेने खुर्चीवर बसला आहे. तर वधू जमिनीवर आपल्या लग्नाच्या लेहंग्यात खाली मान करून बसली आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की वधू आणि वर खोलीच्या एका कोपऱ्यात बसले आहेत. नातेवाईकही त्यांच्या बेडवर येऊन झोपले आहेत. त्याचबरोबर काही महिला बेडवर बसलेल्याही दिसतात. तर वर खुर्चीवर बसलेला दिसतोय, उदास वाटत आहे. नातेवाइकांच्या या कृतीमुळे तो किती चिडला आहे, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते. तर जमिनीवर बसलेली नववधूही नाराज झालेली दिसते. हे संपूर्ण दृश्य काहीसे हास्यास्पद वाटू लागते पण त्याचवेळी नवऱ्याच्या अवस्थेचीही दया वाटते.
लग्नाचा हा व्हायरल व्हिडिओ @foofaji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भावासोबत चुकीचे होत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण नवरा समाज हा व्हिडिओ पहिल्यांनंतर घाबरलेला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरंच खूप वाईट झालं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.