बाबू-सोनाचे हट्ट पुरवता पुरवता चोर झाला! वडील AirForce मध्ये अन् स्वतः ही B.Tech इंजीनियर, तरी करायचा चोऱ्या, सौजन्य : सोशल मीडिया
ग्वाल्हेर जीआरपी (रेल्वे पोलीस) यांच्या मते, त्यांनी अशा एका व्यक्तीला अटक केली आहे, जो खुद्द B. Tech इंजीनियर आहे. हा आरोपी आपल्या प्रेयसिचे हट्ट पूरवण्यासाठी लांब पल्ल्यांच्या ट्रेनमधील एसी डब्ब्यांमध्ये प्रवाशांचे सामान चोरायचा. आधी तो श्रीमंत प्रवाशांना हेरायचा. नंतर ते झोपले की, त्यांची बॅग घेऊन येईल त्या स्टेशनवर उतरायचा. पोलिसांनी या आरोपीकडून 34 बॅग जप्त केल्या आहेत. या बॅगेतील सामानाची किंमत 8 लाख 26 हजारांच्या घरात जाते.
ट्रेनमधील प्रवाशांना लुटण्यासाठी आरोपी कथितरित्या एक खास रणनीति वापरायचा. तो चांगले व महागडे कपडे परिधान करत एसी कोचने प्रवास करायचा, जेणेकरून इतर प्रवाशांना त्याच्यावर संशय येणार नाही. प्रवासादरम्यान तो इतर प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असायचा. ज्यावेळी प्रवाशांचे लक्ष इतरत्र ठिकाणी गेले की, तो त्यांची बॅग घेऊन पुढील स्टेशनवर उतरायचा.
या आरोपीचे नाव दिलीप मौर्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार B. Tech इंजीनियर असलेल्या दिलीपचे वडील सध्या Air Force मध्ये कार्यरत आहेत. दिलीपने आपल्या प्रेयसिची हौस व हट्ट पुरवण्यासाठी चोरी करण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान जीटी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चोरीच्या सामानाचे प्रकरणही समोर आले. गोल का मंदिर परिसरातील प्रगती विहारचे रहिवासी असलेल्या दीपक शर्मा यांच्या सामानाचा तपास करताना दिलीप पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याशिवाय नागपुरची रहिवासी असलेल्या विशाखा शशिकांत यांच्या सामानाच्या चोरीच्या प्रकरणातही दिलीपचे नाव समोर येत आहे.
चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल
जीआरपीने आरोपीकडील सर्व 34 बॅगा जप्त केल्या आहेत. त्यात ट्रॉली बॅग, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर महागड्या सामानांचा समावेश आहे. या सर्व सामानांची एकूण किंमत 8 लाख 26 हजारांच्या घरात जाते. जीआरपीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किर्ती नरवरिया यांच्या मते, आरोपी सुरुवातीला एका फायनान्स कंपनीत काम करायचा. आर्थिक नुकसानीनंतर त्याची परिस्थिती बदलली. मग त्याने चोरी करण्यास सुरुवात केली.
पोलीस आता हे माहिती करून घेत आहेत की, त्याने कोण-कोणत्या ट्रेनमधील प्रवाशांना निशाणा बनवले होते व जप्त करण्यात आलेला सामना कोणत्या प्रवाशांचा आहे. दरम्यान, आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे.
जीआरपीला अपेक्षा आहे की, या चौकशीतून जप्त केलेला सामानाबाबत योग्य ती माहिती मिळू शकेल. तसेच त्यातून याप्रकरणाशी निगडीत आणखीन किती तथ्य समोर येणार आहेत.
Ans: आपल्या प्रेयसीचे (गर्लफ्रेंडचे) महागडे हट्ट आणि हौस पूर्ण करण्यासाठी त्याने चोऱ्या करण्यास सुरुवात केली.
Ans: ग्वाल्हेर जीआरपीने दिलीप मौर्या नावाच्या बी.टेक. इंजिनिअर तरुणाला ट्रेनमधील प्रवाशांचे सामान चोरी केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे.
Ans: आरोपी महागडे कपडे घालून एसी कोचमधून प्रवास करायचा. प्रवासी झोपल्यानंतर किंवा त्यांचे लक्ष नसताना तो त्यांच्या बॅगा घेऊन पुढील स्टेशनवर उतरायचा, असा पोलिसांचा आरोप आहे.






