फोटो सौजन्य सोशल मिडिया
प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच नराधम बापाला बेड्या ठोकल्या. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सोपान नरळे यांनी दिली. या प्रकरणात १० वर्षीय पीडित मुलीच्या २४ वर्षीय भावाने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे पत्नीसोबत राहून पेंटर काम करुन आपला – उर्दनिर्वाह करतात. तर त्याचे लहान भाऊ व १० – वर्षीय पीडित बहिण नराधम बापासोबत राहतात.
पुण्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड; तब्बल ५ लाख ६४ हजारांच्या नोटांसह चौघांना अटक
२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१६ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या काकांनी फोन करून पीडित – मुलगी आणि वडील घरी दिसत नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने वडिलांच्या घरी – जाऊन पाहिले; मात्र दोघेही तेथे आढळले नाहीत, त्यामुळे त्याने दोघांचा शोध सुरू केला. दरम्यान, जहागीर कॉलनी, जटवाडा रोड परिसरात राहणाऱ्या मावस बहिणीचा फोन आला. तिने – पीडित मुलगी त्या परिसरात आल्याचे सांगितले. फिर्यादी तेथे पोहोचला असता पीडिता त्याला दिसली. भावाला पाहताच ती रडू लागली.
भावाने विश्वासात तिची चौकशी केली असता, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरी वडिलांनी अंगावरील कपडे जबरदस्तीने काढले, अंगावर थंड पाणी टाकले आणि हातापायांना सिगारेटचे चटके दिले, असे पीडितेने भावाला सांगितल्याचे फिर्यादीत नमुद आहे. तसेच डोक्याच्या मागील बाजूचे केस कापून विनयभंग केल्याचाही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. मुलीने सांगितलेल्या प्रकारानंतर फिर्यादीने सिडको पोलिस ठाणे गाठुन दिलेल्या तक्रारीनंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोपान नरळे करित आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून मानव जातीला काळीमा पासणाऱ्या घटनेचा निषेध होत आहे.
चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल






