(फोटो सौजन्य-AI एआय)
जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी शासकीय प्रयत्न सुरू अर असले, तरी ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचण्याची गरज आहे. सहज उपलब्धतेतून व्यसनाची सुरुवात मित्रांचा आग्रह, कुतूहल, बेरोजगारी आणि भविष्याची चिंता अशा कारणांमुळे काही तरुण व्यसनाकडे वळतात. पानटपऱ्या व किरकोळ दुकानांतून अल्पवयीनांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते का, तसेच शाळा परिसरातील नियमांचे पालन होते का, याची नियमित तपासणी व्यसनामुळे घरखर्चावर किंवा कर्जबाजारीपणावर किती परिणाम झाला, याची जिल्हानिहाय आकडेवारी उपलब्ध नसली, तरी या प्रश्नाचा अभ्यास आवश्यक आहे.
ग्रामपंचायत, शाळा, युवक मंडळे आणि आरोग्य विभागाने एकत्रितपणे जनजागृती, तपासणी व समुपदेशनावर भर द्यावा. उपचार आणि कुटुंबाचा आधार मिळणे गरजेचे आहे. कारवाईसोबत जनजागृतीवर भर जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत अमलीपदार्थ आणि तंबाखूविरोधी कारवाईचा आढावा घेण्यात आला. शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तपासणीसाठी विशेष पथके तयार करून नियमित मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध नोंटीनमार जिल्यात नंवाग्वतिरोधी आवश्यक आहे.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून ध्यमातून तंबाखू, खर्रा आणि अन्य व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केली जाते. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनांमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम समजावून सांगितले जातात. आरोग्य शिबिरे, समुपदेशन आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांद्वारे नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले जाते. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच शाळा, ग्रामपंचायती, पालक आणि नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा.
मोहिमेंतर्गत ५० हजार ९०० नोंदी आणि ८०२ चालान करण्यात आले. तंबाखू सोडण्यासाठी १७५ जणांना मार्गदर्शन, तर ७ हजार ६४९ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले. भंडारा केंद्रात ३७ हजार २४० नोंदी आणि ५२६ चालान झाले. जिल्ह्यात १ लाख २ हजार ५५४ नागरिकांची मुखकर्करोग तपासणी करण्यात आली.
💡 Frequently Asked Questions
1. भंडारा जिल्ह्यात तरुण व्यसनांकडे का वळत आहेत?
मित्रांची संगत, कुतूहल, बेरोजगारी, भविष्याची चिंता आणि तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता ही व्यसन सुरू होण्यामागील काही संभाव्य कारणे आहेत.
2. तंबाखू आणि खर्रा खाल्ल्याने कोणते आरोग्यविषयक धोके संभवतात?
तंबाखू आणि खर्रा यांच्या सेवनामुळे मुखकर्करोगासह हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या इतर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तंबाखूचे सेवन टाळणे आणि लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
3. भंडारा जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
जिल्ह्यात जनजागृती, तंबाखूविरोधी कारवाई, समुपदेशन आणि मुखकर्करोग तपासणी केली जात आहे. शाळा, ग्रामपंचायती, पालक आणि आरोग्य विभागाच्या एकत्रित सहभागातून या प्रयत्नांना जास्त प्रभावी बनवता येऊ शकते.






