
कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण
इचलकरंजी : कपडे पिळून वाळत घाल म्हटल्याच्या कारणावरून लाकडी फळी व लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी मयुर चंद्रकांत कांबळे, चंद्रकांत धनपाल कांबळे, अलका चंद्रकांत कांबळे आणि आरती लखन कांबळे (सर्व रा. शेळके मळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी आनंदी संजय कांबळे (वय ३८ रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर ) हिने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व संशयित हे नातेवाईक आहेत. आनंदी कांबळे माहेरी आपल्या दारात धुणीभांडी करत असताना वरच्या बाजूस राहण्यास असलेल्या सावत्र भावाच्या बायकोने वाळत घातलेल्या कपड्यांचे पाणी तिच्यावर अंगावर पडत होते. त्यामुळे आनंदीने सावत्र भावजय अलका हिला कपडे पिळून वाळत घाल असे सांगितले. त्यावर सावत्र भाऊ चंद्रकांत याने मुलगा मयुर यास बोलावून घेतले आणि दोघांनी मिळून आनंदी व तिचा मुलगा सुमित यांना लाकडी फळीने मारहाण केली.
तसेच आनंदीची मुलगी अपूर्वा हिलाही मयुर व आरती यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत बघून घेण्याची धमकी दिली. तर मारहाणीत आनंदीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडले. या प्रकरणी आनंदी कांबळे हिच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार
नवी दिल्ली येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. याचा बदला घेण्यासाठी त्याच्या १८ वर्षीय मित्राने टिचरवर चाकूने वार केला. ही घटना २ जानेवारी रोजी कोंडली पुलाजवळ घडली. टीचरच नाव जय प्रकाश (३२) असे आहे.
हेदेखील वाचा : Chandrapur Kidney Racket : किडनी प्रकरणातील मोठी माहिती लवकरच समोर? आरोपीच्या शोधासाठी पोलिस कोलकात्यात