Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: पैशांच्या वादातून मित्राचा दगड घालून खून; बीड LCBने 24 तासांत प्रकरणाचा केला उलगडा

बीडमध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड LCBने अवघ्या 24 तासांत आरोपी अतिक तांबोळी याला अटक करत खुनाचा छडा लावला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 11:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून मित्राची हत्या
  • दगडवाडी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला
  • बीड LCBने 24 तासांत आरोपीला अटक करत गुन्हा उघडकीस आणला
बीड: बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पैश्यांच्या वादातून आपल्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली आहे. अवघ्या २४ तासांच्या आत बीड स्थानिक गुन्हे शाखेने(LCB) पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव अतिक गुलाब तांबोळी असे आहे.

Uttar Pradesh Crime: गाझियाबाद हादरलं! तीन अल्पवयीन बहिणींची नवव्या मजल्यावरून उडी मारून सामूहिक आत्महत्या; कारण काय?

काय नेमकं प्रकरण?

२ फेब्रुवारीला पाटोदा पोलीस स्टेशन हद्दीतील दगडवाडी गावच्या शिवारात, बीड ते शिरूर रोडवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. चाँद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय 30, रा. रायमोहा, ता. शिरूर) याचा एका इसमाने डोक्यात दगड मारून हत्या केली होती. तो व्यवसायाने पेंटर होता. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली होती. पाटोदा पोलीस ठाण्याचा हत्या खुनाचा (BNS कलम 103) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कशी केली अटक?

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. त्यांनतर त्याने हा गुन्हा उघडकीस आणणं पोलिसांसमोर आव्हान होतं. पोलिसांनी विशेष पथक तैनात केलं आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. तपासादरम्यान संशयाची सुई अतिक गुलाब तांबोळी (रा. ईस्लामपुरा पेठ, बीड) याच्याकडे वळली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बीडच्या शासकीय रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतलं.

आरोपीची चौकशी करत असतांना सुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांच्या कठोर चौकशीतून त्याने आपला गुन्हा कबुल केला. आरोपी अतिकने मृत चाँद तांबोळी याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. चाँद हा वारंवार आपल्या पैशांची मागणी करत तगादा लावत होता. याच वादातून संतापलेल्या अतिकने चाँदचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांने चाँदला दगडवाडी शिवारात नेले आणि तिथे डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.

पोलिसांनी अवघ्या २४ तासात या घटनेचा उलगडा केला असून पोलीस आरोपीच्या तपासणी साठी तपासासाठी पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता त्याच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे.

Akola Crime: धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: उधारीचे पैसे परत मागितल्यामुळे आरोपी संतापला आणि खून केला.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: अतिक गुलाब तांबोळी, रा. ईस्लामपुरा पेठ, बीड.

  • Que: पोलिसांनी गुन्हा कसा उघडकीस आणला?

    Ans: गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने LCBने तपास केला.

Web Title: Beed crime a friend was murdered with a stone over a money dispute the beed lcb solved the case within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.