Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद; मित्रांकडून 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, होमगार्डही हत्याकांडात सामील

बीडच्या बेलुरा गावात 19 वर्षीय तरुणाची मित्रांनी संगनमताने चाकूने भोसकून हत्या केली. पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद झाल्याने हा प्रकार घडला. एक आरोपी ताब्यात, इतरांचा शोध सुरू आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 27, 2026 | 10:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मित्रांकडून 19 वर्षीय तरुणाची हत्या
  • पत्नीच्या फोटोवरून वादातून कट रचला
  • एक आरोपी ताब्यात, इतर फरार
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एका जण होमगार्ड असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माझ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर का टाकले, या कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा काटा काढण्यात आला. ही घटना बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेलुरा गावात घडली.

Uttar Pradesh Crime: दुहेरी हत्याकांड! सासरी घुसला आणि पत्नी आणि सासूवर चाकूने सपासप केले वार; कारण काय?

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुशांत गवते (१९ वर्ष) असे आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी शुक्रवारी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. शाहदेव आश्राजी गवते हे आपल्या नातेवाईकासह मोटारसायकलवरून जात असतांना, त्यांना नारायणगडच्या दक्षिण बाजूला असलेल्या हॅलिपॅडच्या मोकळ्या जागेत ओरडण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आवाज आला. त्यांनी मोटारसायकलच्या लाईटच्या उडेजात पाहिले असता, तीन लोकांनी सुमितला घट्ट पकडून ठेवले होते आणि चौथा आरोपी त्याला चाकूने भोकसत होता. तो जवळ येईपर्यंत आरोपींनी सुमितवर जीवघेणा हल्ला केला होता. सुमित रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी पाठलाग करून एका आरोपीला जागीच पकडले.

हत्येमागचं कारण काय?

आरोपीचे नाव रुस्तुम गोवर्धन गवते असे आहे. काही आक्षेपार्ह फोटो सुमितने दाखविल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. या वादाचा वचपा काढण्यासाठी रितेश सतीश बहिर, रुस्तम गोवर्धन गवते, ज्ञानेश्वर दत्ता लाटे आणि सूरज मच्छिंद्र नागरगोजे यांनी जाणीवपूर्वक कट रचला.

फिर्यादीनुसार, रुस्तुम, ज्ञानेश्वर आणि सूरज यांनी सुमितचे हातपाय पकडून ठेवले होते, तर रितेश बहिर याने त्याच्या हातातील धारदार चाकूने सुमितच्या पोटात वार केले. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे आणि मदतीसाठी वाहन न मिळाल्याने सुमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला.याप्रकरणी शहादेव गवते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हत्येची कबुली दिली असून होमगार्डनेच अशा प्रकारे क्रूर हत्या केल्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून, या घटनेमुळे बेलुरा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

मानसिक छळाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या; पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील बेलुरा गावात.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून झालेला वाद.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: एक आरोपी ताब्यात असून इतरांचा शोध सुरू आहे.

Web Title: Beed crime dispute over wifes objectionable photos 19 year old youth brutally murdered by friendshome guard also involved in the killing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज
1

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!
2

Dr Nitin Thorve यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण, पोलिसांवर १५ कोटी मागितल्याचा आरोप!

Beed Drought: बीडमध्ये दुष्काळाचा फळबागांना फटका; मोसंबीचा हब असलेल्या शिरसमार्गमध्ये शेतकऱ्यांची बागांवर कुऱ्हाड
3

Beed Drought: बीडमध्ये दुष्काळाचा फळबागांना फटका; मोसंबीचा हब असलेल्या शिरसमार्गमध्ये शेतकऱ्यांची बागांवर कुऱ्हाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.