Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: संतापजनक! अडीच वर्षांच्या चिमुकलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; आरोपी ताब्यात

बीडच्या अंबाजोगाईत अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूमागे लैंगिक अत्याचार असल्याचे पोस्टमॉर्टेममध्ये उघड झाले. १५ वर्षीय नातेवाईकाने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 01:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चिमुकलीच्या मृत्यूमागे अत्याचाराचा धक्कादायक खुलासा
  • १५ वर्षीय नातेवाईकाने गुन्ह्याची कबुली दिली
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ताब्यात
बीड: बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला. घडलेली घटना बीड जिल्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Hyderabad Crime: वर्षभर बेपत्ता महिला घरातच पुरलेली, सांगाडा सापडताच खळबळ; नेमकं प्रकरण काय?

काय घडलं नेमकं?

अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चिमुकलीचा १७ मार्च २०२६ रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा केवळ अपघात वाटत होते म्हणून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णलयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करतांना मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याचे निर्दशनास आणून दिले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला.

अत्याच्याच मुलाने केला अत्याचार

पोलिसांना तपासादरम्यान पीडितेच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी असलेला तिच्या आत्याचा १५ वर्षीय मुलगा ३ दिवस जेवला नव्हता आणि सतत राडात होता अशी माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या संशयावरून पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेच्या मृत्यूपूर्वी आठ दिवस अगोदर आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेले आणि घरात कोणी नसतांना मोबाईलवरील अश्लील व्हिडीओ पाहून तिच्यावर अत्याचार केले. त्यापूर्वी देखील त्याने तिच्यावर एकदा अत्याचार केल्याची कबुली दिली.

गुन्हा दाखल

या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम २०१२ च्या कलम ४, ६, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून हळहळ व्यक्त केले जात आहे.या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Baramati Crime: देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण! भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं; बारामतीतील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कसे उघडकीस आले?

    Ans: शवविच्छेदन अहवालातून अत्याचार स्पष्ट झाला.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: पीडितेचा १५ वर्षीय नातेवाईक मुलगा.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला ताब्यात घेऊन पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Beed crime outrageous 25 year old girl abused by relative accused taken into custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.