• संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
• भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं
• व्हिडिओ व्हायरल; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बारामती: बारामती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्यानेच आपल्या बायकोची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. संशयावरून त्याने भररस्त्यात बेदम मारहाणच केली नाही तर धावत्या कारखाली चिरडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काय नेमकं घडलं ?
या प्रकरणातील मृत महिलेचे नाव शैला आणि आरोपी पतीचे नाव अक्षय असे आहे. हे दाम्पत्य बारामतीचे असून हे कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते. गाणगापूरला जात असताना बल्लुरगी गावाजवळ कारमध्ये असतांना त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपी पटीने कार थांबवून पत्नीला बाहेर ओढले. त्यांनतर तिथेच तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना सकाळी ११च्या सुमारास घडली असून, रस्त्यावर जाणाऱ्या काही स्थानिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
व्हिडिओमध्ये काय?
व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आरोपी पती आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतांना दिसत आहे. पीडित महिला मदतीसाठी ओरडत होती, त्यावेळी काही स्थानिक लोक तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी पतीला बाजूला केले. काही काळ परिस्थिती शांत झाली. मात्र लोकांनी सोडवल्यानंतर काही वेळातच त्याने पुन्हा एकदा पत्नीवर हल्ला चढवला.
कारने चिरडले
दुसऱ्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये असे दिसते की, मारहाणीमुळे ती महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोकळ्या जागेत कोसळली होती. त्याच वेळी आरोपी पतीने आपली मारुती सुझुकी अर्टिगा कार वेगाने मागे घेतली आणि जमिनीवर पडलेल्या पत्नीच्या अंगावर घालून तिला चिरडले. यात गंभीर जखमी झालेल्या 28 वर्षीय शैला हिचा जागीच मृत्यू झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाही आरोपी पती तिथेच थांबून होता.
हत्येमागचे कारण काय?
कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक अडूरू श्रीनिवासुलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पती अक्षय आणि मृत शैला यांच्या लग्नाला 4 वर्षे झाली होती. अक्षयला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्यातूनच त्याने हा हत्येचा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच
Ans: आधी मारहाण करून नंतर कारखाली चिरडण्यात आले.
Ans: कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात.
Ans: आरोपी पतीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.






